शीतल तळपदे
शीतल तळपदे हे नाट्यप्रयोगांची प्रकाशयोजना करणारे नाट्यकर्मी आहेत.
तळपदे यांचे बालपण सोलापूर आणि अलिबाग येथे गेले. तेथील नाट्यमंदिरांमधील वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.नाटकातील प्रत्यक्ष सहभागाची संधी त्यांना विलेपार्लेमधील नरसी मोनजी महाविद्यालयात आणि नंतर माध्यम या हौशी नाट्यसंस्थेत मिळाली. तेथे त्यानी अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, बॅकस्टेज, इ. कामे केली. या संस्थेत प्रकाशयोजना करणारी व्यक्ती नव्हती.
प्रकाशयोजनाकार
संपादनत्यात शीतल तळपदे माध्यमसाठी नाट्यस्पर्धेमधील नाटकात छोटी भूमिका करीत असताना प्रयोगाच्या वेळी ठरविलेला प्रकाशयोजनाकार न आल्याने तळपदे यांनी त्या नाटकाची प्रकाशयोजना केली. त्यास बक्षीस मिळाल्यावर त्यांनी प्रकाशयोजनाकाराचे काम करणे सुरू केले.
अधिकृत प्रकाशयोजनाकार
संपादनपुढे नरसी मोनजी कॉलेजच्या एकांकिकांची प्रकाशयोजना शीतल तळपदेच करू लागले. ती बघून महेंद्र जोशी यांनी ‘एक शक’ या हिंदी नाटकाची जबाबदारी तळपदेंवर सोपवली. मानसोपचारतज्ज्ञ व त्याचा रुग्ण यांच्यातील नाट्यपूर्ण संघर्षांचा वेध घेणारे हे नाटक होते.
शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना असलेली नाटके
संपादन- असा मी असा मी
- एक शक (हिंदी)
- एका लग्नाची गोष्ट
- किमयागार (मराठी संगीतिका)
- खेलय्या (गुजराती संगीतिका)
- चंद्रपूरच्या जंगलात
- ज्याचा त्याचा विठोबा
- ढॅण ट ढॅण
- ताथैया (हिंदी)
- तुंबारा’
- तू तर चाफेकळी
- मी शाहरूख मांजरसुंभेकर
- रस्ते
- राजा सिंह (बालनाट्य)
- लोच्या झाला रे
- हाच खेळ उद्या पुन्हा
- हा शेखर खोसला कोण?