शिवमंदिर (मुखेड)

(शिवमंदिर, मुखेड या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी असलेले शिवमंदिर हे इसवी सनाच्या अकराव्या शतकात बांधले गेले असावे.[]

मुखेड येथील शिवमंदिर

मंदिराची रचना

संपादन

एक मुखमंडप आणि दोन अर्धमंडप असलेला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराच्या गर्भगृहात एक मीटर उंचीच्या भद्रपीठावर शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील मंडोवरावर मूर्तिशिल्पे आहेत. त्यातील सप्तमातृकांच्या मूर्ती उल्लेखनीय आहेत. मंदिराच्या अंतर्भागात मंडपाच्या मधोमध अंकण आहे. चौरस तळखडा, त्यावर अष्टकोनाकृती आणि वर्तुळाकृती घटक, त्यावर शीर्ष आणि कीचकहस्त असा सामान्यपणे मंदिरातील स्तंभांचा घटकक्रम आहे. एक-दोन स्तंभमात्र याला अपवाद असून त्यांचा घटकक्रम किंचित निराळा आहे. या मंदिराच्या बाहेर एक पुरातन बारव आहे.

चित्रदालन

संपादन

आसपास

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ डॉ. अ.प्र. जामखेडकर. महाराष्ट्र राज्य गॅझेट, इतिहास-प्राचीन काळ, खंड १ भाग २.