शिकरा

(शिक्रा या पानावरून पुनर्निर्देशित)

शिक्रा (इंग्रजी: Shikra) (शास्त्रीय नावः Accipiter badius) हा मानवी वस्ती तसेच विरळ झाडे-झुडपे असलेल्या भूप्रदेशात आढळणारा शिकारी पक्षी आहे. याचे मुख्य खाद्य लहान पक्षी, सरडे, पाली तसेच इतर पक्ष्यांची अंडी हे आहे.

शिक्रा (इं.:Chappad Chidi), मोहाली , पंजाब, भारत
शिक्रा
Accipiter badius

हा पक्षी वरून गडद तपकिरी आणि फिकट करडा असतो. पोटाकडून पिवळट असून, त्यावर मधून-मधून काळे पट्टे असतात. नर व मादी सारखे दिसायला असतात. शेपटी आणि पंखाखाली काळ्या पट्ट्या असतात. याच्या संपूर्ण अंगावर काळे पट्टे असल्यामुळे या पक्ष्याला ओळखताना याची ससाण्याबरोबर नेहेमी गफलत होते.