शाह आलम (मलेशिया)
(शाह आलम, मलेशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
शाह आलम (भासा मलेशिया: Shah Alam ;) ही मलेशियाच्या संघातील सलांगोर राज्याची प्रशासकीय राजधानी आहे. सलांगोरातील पतालिंग व क्लांग जिल्ह्यांमध्ये वसलेले शाह आलम मलेशियाच्या संघीय राजधानीपासून, म्हणजे क्वालालंपुरापासून २५ कि.मी. पश्चिमेस वसले आहे. सलांगोराची पूर्वीची राजधानी असलेले क्वालालंपूर इ.स. १९७४ साली संघशासित प्रदेश बनल्यावर इ.स. १९७८ साली क्वालालंपुराऐवजी शाह आलम सलांगोराच्या राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५७ साली मलेशिया स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात वसवण्यात आलेले ते पहिले नियोजित शहर आहे.
हा लेख मलेशियातील शाह आलम शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शाह आलम (निःसंदिग्धीकरण).
शाह आलम Shah Alam |
|
मलेशियामधील शहर | |
देश | मलेशिया |
राज्य | सलांगोर |
स्थापना वर्ष | इ.स. १९६३ |
क्षेत्रफळ | २९०.३ चौ. किमी (११२.१ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ५,८४,३४० |
प्रमाणवेळ | मलेशियन प्रमाणवेळ (यूटीसी +८:००) |
http://www.mbsa.gov.my/ |
बाह्य दुवे
संपादन- माजलिस बांदाराया शाह आलम - शाह आलम नगरपरिषदेचे अधिकृत संकेतस्थळ (भासा मलेशिया मजकूर)