शास्वत विकासाच्या पाऊलवाटा

उपक्रम एक शास्त्रीय संशोधनाच्या रूपात राबविण्याचे ठरले. अनेक विध शासकीय संस्था BIRAC, Department of biotechnology, Bill and milinda gates foundation, USAID, Institute of Chemical Technology (ICT) ह्यात सहभागी होत्या. 200 सौर वाळवण यंत्र, 200 महिलांना देण्याचे ठरले. ह्या महिलांची निवड करताना ज्यांच्याकडे थोडी फार शेती आहे व स्वतः पावसाळ्यापुरता भाजीपाला घेतात अशा महिलांची निवड करण्यात आली आठ गावातील 200 महिला ह्या संशोधनात सहभागी होणाऱ्या आहेत. अर्थातच अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्याचे ठरविल्यामुळे ह्या अभ्यासगटातील सौरवाळवण यंत्र वापर करणाऱ्या 200 महिलांना त्यांचाच भागातील दुसऱ्या आठ गावातील ज्यांचा आर्थिक सामाजिक स्तर व वयोगटानुसार मॅचिंग गट जो संशोधनात राहील पण त्यांच्याकडे सौर वाळवण यंत्र नसतील असा दुसरा गट निवडला. सर्व सहभागी 400 महिलांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यांची वजन, उंची व रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यानंतर 200 महिलांना सौर वाळवण यंत्र देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक गावातून एक ऊर्जामित्र निवडण्यात आली. प्रशिक्षण घेऊन सौर वाळवण यंत्राचे आपल्या गावात जोडणी करण्याचे काम ह्या उर्जामित्रांनी पूर्ण केले.