शांती एकांबरम कोटक महिंद्रा बँकेत ग्राहक बँकिंगच्या अध्यक्षा आहेत. त्या बारा हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत आहेत.[ संदर्भ हवा ] बिझनेस टुडेच्या मोस्ट पॉवरफुल विमेन इन इंडिया या यादीत त्यांचे नाव अनेक वेळा आलेले आहे..

त्यांचा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियानं 'सीए बिझनेस वुमन लीडर फॉर २०१४' देऊन त्यांचा गौरव केला आहे. इंडियन मर्चट्स अंबर्स लेडिज विंगनं 'वुमन ऑफ द इयर, २०१३-१४ इन बँकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्विसेस म्हणून त्यांना संबोधलं आहे. २०१३-१४ मध्ये बाजारपेठ काहीशी थंडावलेली असताना, त्यांनी ५२ अब्ज डॉलर्सचे महत्त्वाचे सौदे करण्यासाठी कोटकला मदत केली.

अगदी लहान वयापासून शांती यांच्या मनात आयुष्यात यशस्वी होण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची महत्त्वाकांक्षा खोलवर रुजलेली होती. वित्त विषयात त्यांना मुळातच रस असल्यामुळे त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली आणि नंतर त्या सीए झाल्या. बँक ऑफ नोव्हा स्कॉटियामध्ये त्यांनी पहिली नोकरी केली, तिथे त्यांची भेट उदय कोटक यांच्याशी झाली. ते बँकेचे क्लाएंट होते. त्यांनी १९९१ मध्ये शांती यांना कोटक महिंद्रामध्ये काम केले. २००३ मध्ये KMLFला बँकिंग लायसेन्स मिळाले आणि कंपनीसाठी कॉर्पोरेट बँकिंगमध्ये व्यवसाय उभारला.[]

  1. ^ किडवाई, नैना (2016). ३० सामर्थशाली स्त्रिया. पुणे: सकाळ प्रकाशन. p. 280. ISBN 978-93-86204-06-6.