शांतादुर्गा
शांतादुर्गा ही गोवा येथे असलेली देवी आहे.हिचे मंदिर गोव्याच्या कवळे गांवात आहे.
आख्यायिका
संपादनविष्णू व शिव यांचे एकदा युद्ध झाले.ते थांबत नव्हते म्हणून ब्रम्हदेवाने दुर्गेला बोलावून त्यांना शांत करण्याची विनंती केली.दुर्गा देवीने त्यांना शांत केले म्हणून देवीचे 'शांतादुर्गा' हे नाव पडले.
इतिहास
संपादनत्रिहोत्रीपूरहून ही देवता सारस्वत ऋषीच्या वंशजांनी गोव्यात आणली.या देवतेचे मूळ मंदिर केळोशी या गावात होते.सन १५६६ नध्ये ते उद्धस्त केल्या गेले.[ संदर्भ हवा ]ती मूर्ती मग कवळे येथे आणण्यात आली.तेथे मातीचे मंदिर बांधण्यात आले.छत्रपती शाहूमहाराजांचा(छ.शिवाजी-२) कार्यकाळात या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.
वर्णन
संपादनहे मंदिर जमिनीपासून उंच ठिकाणी वसलेले आहे.येथे दीपमाळ व नगारखाना आहे.या मंदिराचे छत कौलारू आहे.याचा कळस सोन्याचा असून दरवाजा दुतर्फा चांदीने मढविलेला आहे.शांतादुर्गेची मूर्ती शिव व विष्णू यांचे मूर्तीमध्ये आहे.कौशिक,भारद्वाज वत्सइत्यादी गोत्रांच्या लोकांचे हे दैवत आहे.[१]
संदर्भ
संपादन- ^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-छोटे उस्ताद पुरवणी,पान क्र.४,दि. २३/११/२०१३ मथळा: गोव्याची कुलस्वामिनी शांता दुर्गा दि. २३/११/२०१३ रोजी ०९.५६ वाजता जसे दिसले तसे.
बाह्यदुवे
संपादन- शांतादुर्गा देवीस अर्पित केलेले संकेतस्थळ Archived 2011-12-03 at the Wayback Machine.