शतकपूर्ती कसोटी सामने

(शतकपुर्ती कसोटी सामने या पानावरून पुनर्निर्देशित)

१५ मार्च १८७७ रोजी जगातला पहिला वहिला कसोटी सामना मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांमध्ये खेळविण्यात आला. त्याला इ.स. १९७७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली, तर १८८० मध्ये इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना आयोजित केला गेला होता. त्याला १९८० मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. या दोन घटनांची शंभरी साजरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १९७७ साली मेलबर्न येथे आणि १९८० साली लॉर्ड्‌स येथे शतकपूर्ती कसोटी सामना भरविला. दोन्ही कसोटी सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झाले.

जगातला पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकला होता तर योगायोगाने मेलबर्न येथील शतकपूर्ती कसोटीदेखील ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनीच जिंकली !

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७६-७७

संपादन
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७६-७७
 
ऑस्ट्रेलिया
 
इंग्लंड
तारीख १२ – १७ मार्च १९७७
संघनायक ग्रेग चॅपल टोनी ग्रेग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

आंतरराष्ट्रीय क्रिकेटची शंभरी साजरी करण्यासाठी इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला. १२ ते १७ मार्च दरम्यान मेलबर्नमध्ये एकमेव कसोटी सामना खेळविला गेला. हा सामना जागतिक ८००वा कसोटी सामना होता, तर या दोन संघांमधला २२५वा कसोटी सामना होता. ही एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकली.

एकमेव कसोटी

संपादन
१२-१७ मार्च १९७७
धावफलक
वि
१३८ (४३.६ षटके)
ग्रेग चॅपल ४० (१३९)
डेरेक अंडरवूड ३/१६ (११.६ षटके)
९५ (३४.३ षटके)
टोनी ग्रेग १८ (२०)
डेनिस लिली ६/२६ (१३.३ षटके)
४१९/९घो (९६.६ षटके)
रॉडनी मार्श ११०* (१७३)
क्रिस ओल्ड ४/१०४ (२७.६ षटके)
४१७ (११२.४ षटके)
डेरेक रॅन्डल १७४ (३५३)
डेनिस लिली ५/१३९ (३४.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • डेव्हिड हूक्स (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०

संपादन
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०
 
इंग्लंड
 
ऑस्ट्रेलिया
तारीख २८ ऑगस्ट – २ सप्टेंबर १९८०
संघनायक इयान बॉथम ग्रेग चॅपल
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०



एकमेव कसोटी

संपादन
२८ ऑगस्ट - २ सप्टेंबर १९८०
धावफलक
वि
३८५/५घो (१३४ षटके)
किम ह्युस ११७ (२०९)
क्रिस ओल्ड ३/९१ (३५ षटके)
२०५ (६३.२ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ६२ (१४६)
लेन पास्को ५/५९ (१८ षटके)
१८९/४घो (५३.२ षटके)
किम ह्युस ८४ (९९)
क्रिस ओल्ड ३/४७ (२० षटके)
२४४/३ (८२ षटके)
जॉफ्री बॉयकॉट १२८* (२५२)
डेनिस लिली १/५३ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: किम ह्युस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी..
  • बिल ॲथी (इं) याने कसोटी पदार्पण केले.