शकरुन्निसा बेगम
शकरून्निसा बेगम किंवा शकर-उन-निसा बेगम, किंवा शकर अल-निसा बेगम [१] (मृत्यू १ जानेवारी १६५३) ही एक मुघल राजकन्या होती, जी सम्राट अकबराची मुलगी होती.
shahzadi of Mughal Empire | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
मृत्यू तारीख | जानेवारी १, इ.स. १६५३ आग्रा किल्ला, आग्रा | ||
---|---|---|---|
चिरविश्रांतीस्थान |
| ||
वडील | |||
भावंडे | |||
| |||
शकरून्निसा बेगम यांचा जन्म फतेहपूर सिक्री येथे अकबर आणि बीबी दौलत शाद यांच्या पोटी झाला. तिला आरम बानो बेगम नावाची एक धाकटी बहीण होती.[२]
१५९४ मध्ये अकबरने शाहरुख मिर्झासोबत तिचे लग्न लावून दिले. तो इब्राहिम मिर्झा, बदक्शानचा सुलेमान मिर्झा आणि हरम बेगम यांचा मुलगा होता.[३][४] हा विवाह २ सप्टेंबर १५९४ रोजी सम्राज्ञी हमीदा बानो बेगम यांच्या निवासस्थानी झाला.[५]
१६०७ मध्ये शाहरुख मिर्झाच्या मृत्यूनंतर शकरून्निसा विधवा झाली. हसन मिर्झा आणि हुसेन मिर्झा हे जुळे मुलगे, सुलतान मिर्झा आणि बदी-उझ-झमान मिर्झा आणि तीन मुली, असे ७ आपत्ये होते.[६]
१६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर, तिने तिचा भाऊ जहांगीरवर आपला प्रभाव वापरला आणि जहांगीरचा मोठा मुलगा खुसरो मिर्झा यांना क्षमा मिळवण्यासाठी तिच्या सावत्र आई मरियम-उझ-जमानी आणि सलीमा सुलतान बेगम यांना मदत केली.[७]
शकरून्निसा बेगम यांचे १ जानेवारी १६५३ रोजी निधन झाले. तिला सिकंदरा येथे वडिलांच्या समाधीमध्ये पुरण्यात आले.[८][९]
संदर्भ
संपादन- ^ "Portrait of Mirza Shah Rukh". www.rct.uk (इंग्रजी भाषेत).
- ^ Beale, Thomas William; Keene, Henry George (1894). An Oriental Biographical Dictionary: Founded on Materials Collected by the Late Thomas William Beale. W.H. Allen. p. 107.
- ^ Varma, Ramesh Chandra (1967). Foreign Policy of the Great Mughals, 1526 - 1727 A.D. Shiva Lal Agarwala. p. 49.
- ^ Begum, Gulbadan (1902). The History of Humayun (Humayun-Nama). Royal Asiatic Society. pp. 247, 267.
- ^ Beveridge, Henry (1907). Akbarnama of Abu'l-Fazl ibn Mubarak - Volume I. Asiatic Society, Calcuta. p. 990.
- ^ Jahangir, Emperor; Thackston, Wheeler McIntosh (1999). The Jahangirnama: memoirs of Jahangir, Emperor of India. Washington, D. C.: Freer Gallery of Art, Arthur M. Sackler Gallery, Smithsonian Institution; New York: Oxford University Press. pp. 303–4. ISBN 978-0-19-512718-8.
- ^ Xavier, Jesuit (1606). "Missoes Jesuitas Na India". British Library London, MS 9854: 44. Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ Khan, Inayat; Begley, Wayne Edison (1990). The Shah Jahan Nama of 'Inayat Khan: an abridged history of the Mughal Emperor Shah Jahan, compiled by his royal librarian: the nineteenth-century manuscript translation of A.R. Fuller (British Library, add. 30,777). Oxford University Press. p. 489.
- ^ Kanbo, Muhammad Saleh. Amal e Saleh al-Mausoom Ba Shahjahan Nama (Persian) - Volume 3. p. 117.