शंकर दत्तात्रेय देव
शंकरराव दत्तात्रेय देव : (२८ जानेवारी १८९५ – ३० डिसेंबर १९७४) हे महाराष्ट्रातील एक काँग्रेस कार्यकर्ते, गांधीवादी व सर्वोदय नेते होते. शंकररावांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाला. त्यांचे मूळगाव सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील बावधन होते. तेथे त्यांचे आजोबा शेती करत असत, तर वडील दत्तोपंत हे पुण्याला आचारी होते. त्यांच्या आई गंगूबाई, ते अडीच वर्षांचे असतानाच वारल्या होत्या. देव यांचे प्राथमिक शिक्षण भोर येथे त्यांच्या आईच्या काकूंनी केले. पुढील शिक्षणासाठी त्यांच्या चुलत्यांनी १९०६ मध्ये त्यांना पुण्यास नेले. पुणे, बडोदे, मुंबई येथे शिक्षण घेऊन ते बी. ए. झाले (१९१८). त्यानंतर त्यांनी एल्एल्. बी. होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या काळात त्यांचा विनोबा भावे, न. वि. गाडगीळ, छगनलाल जोशी वगैरेंशी निकटचा संबंध आला. पुढे ते म. गांधीच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी झाले. तत्पूर्वी ते चंपारण्यात म. गांधींनी खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ चालविली असता तेथे गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |