व्याज

व्याजबद्दल माहिती

व्याज म्हणजे मुद्दलावर मिळालेला फायदा. कर्जाने घेतलेल्या रकमेवर, म्हणजे मुद्दलावर जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज असे म्हणतात. ज्याने पैसे उधार , कर्जाऊ घेतले त्याने व्याज द्यायचे असते. ज्याचे पैसे असतात त्या सावकाराला, धनकोला, व्याज हे उत्पन्न असते. सावकाराने कर्जाऊ दिलेल्या रकमेवर झालेला हा फायदा असतो.

बँकेमध्ये जे पैसे गुंतवले जातात त्यावर बँक व्याज देते. एका अर्थाने बँकेने आपल्या ग्राहक कडूनघेतलेले हे कर्जच असते.

व्याज दर साल दर शेकडा असे दिले जाते. म्हणजे जर व्याजाचा दर १० टक्के दर सदल दर शेकडा असेल तर कर्जाने घेतलेल्या १०० रुपयांसाठी एक वर्षाने ११० रुपये परत द्यावे लागतील. व्याजाचे दोन प्रकार असतात.

१) सरळ व्याज - व्याजाचा दर १० टक्के दर सदल दर शेकडा असेल तर कर्जाने घेतलेल्या १०० रुपयांसाठी एक वर्षाने ११० रुपये परत द्यावे लागतील. या मध्ये आपण १०० रुपयांचे १० टक्के म्हणजे १० रुपये वाढवले.

२) चक्रवाढ व्याज - व्याजाची रक्कम मुद्दलात वाढवून त्या रकमेवर पुढचे व्याज मोजले जाते. म्हणजे वरील उदाहरणात एक वर्ष झाले कि ११० रुपये मुद्दल समजून त्या रकमे वर दुसऱ्या वर्षाचे व्याज मोजले जाईल ११० वर १० टक्के म्हणजे ११ रुपये व्याज होईल.

३) फ्ल्याट रेट - या मध्ये व्याजाचा दर १० टक्के असला तर संपूर्ण वर्षासाठी संपूर्ण मुद्दलावर व्याज मोजले जाते आणि व्याजाची पूर्ण रक्कम बारा महिन्यात विभागली जाते.साधारणतः वाहन खरेदीच्या कर्जप्रकारांत या पद्धतीने व्याज मोजले जाते.