वैजनाथशास्त्री कानफाडे

ब्रिटीशकालीन भाषांतरकार.

कानफाडे हे नागपूरकर भोसल्यांचे वकील असलेल्या वेणीरामपंत यांचे आश्रित होते.[१]

कार्यकर्तृत्व संपादन

विल्यम कॅरी यांनी कानफाडे यांच्याकडे मराठी भाषेचे अध्ययन केले होते. त्यांनी कानफाडे यांच्याकडून मूळ बंगालीवरून खालील पुस्तकांचे अनुवाद करून घेतले होते.

कानफाडे यांच्या मदतीने विल्यम कॅरी यांनी आधुनिक मराठी गद्याचा तसेच या भाषेतील मुद्रण व्यवसायाचा पाया रचला.[१]

अनुवादित पुस्तके - संपादन

सिंहासन बत्तिशी (१८१४)

हितोपदेश (१८१५)

प्रतापदित्य चरित्र (१८१६)

संदर्भ संपादन

  1. ^ a b "मराठीचे शिलेदार". भाषा आणि जीवन. वर्ष ४०, अंक ०३ : पावसाळा २०२२: ३२-३३.