हितोपदेश
हितोपदेशः (अर्थ: फायदेशीर सल्ला) हा संस्कृत भाषेतील एक भारतीय कथा संग्रह आहे ज्यामध्ये प्राणी आणि मानवी पात्रे असलेल्या दंतकथा आहेत. त्यात नीतीवचन, सांसारिक शहाणपण आणि राजकीय घडामोडींवरील सल्ला सोप्या, सुबक भाषेत समाविष्ट केला आहे.[१] हा संग्रह मोठ्या प्रमाणावर अनुवादित केला गेला आहे.
कथासंग्रह | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | साहित्यिक कार्य | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
लेखक |
| ||
प्रकाशक |
| ||
संपादक |
| ||
वापरलेली भाषा | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
त्याच्या उत्पत्तीबद्दल फारसे माहिती नाही. हयात असलेला मजकूर १२ व्या शतकातील असल्याचे मानले जाते, परंतु बहुधा सन् ८०० ते ९५० च्या दरम्यान नारायण पंडितांनी त्याची रचना केली होती.[२] नेपाळमध्ये सापडलेली सर्वात जुनी हस्तलिखित प्रत १४ व्या शतकातील आहे, आणि त्यातील सामग्री आणि शैली संस्कृत ग्रंथ पंचतंत्र मध्ये सारखी आहे जो अजून प्राचीन काळातील आहे.[१][३]
लेखक आणि त्याचे स्रोत
संपादनहितोपदेशाचे लेखक कोण याच्यावर अनेक मते आहेत. १९व्या शतकातील भारतशास्त्रज्ञांनी या मजकुराचे श्रेय विष्णू शर्मा यांना दिले आहे जे एक कथाकार होते आणि त्याच्या दंतकथांमध्ये एक पात्र म्हणून पण दिसत होते. नेपाळमधील १३७३ मधील मजकुराची हस्तलिखित प्रत सापडल्यानंतर, विद्वान सामान्यतः त्याच्या दोन शेवटच्या श्लोकांचा आधारावर नारायणा लेखक आहेत व धवल चंद्र नावाचा राजाने या ग्रंथाला मदत केल्याचे दिसते. [१] परंतु या लेखकाचे दुसरे कोणतेही कार्य ज्ञात नसल्यामुळे आणि उल्लेखित राजा इतर स्त्रोतांमध्ये सापडला नसल्यामुळे, आपल्याला त्यापैकी जवळजवळ काहीही माहित नाही. त्यात ८व्या शतकातील कामांचे अवतरण आहेत आणि इतर अंतर्गत पुरावे पाल साम्राज्याच्या (८व्या-१२व्या शतकात) पूर्व भारतीय उत्पत्तीकडे निर्देश करतात. [१]
हितोपदेश हा प्राचीन संस्कृत कथासंग्रह, पंचतंत्र, सारखाच आहे. लुडविक स्टर्नबॅकच्या अनुसार, पंचतंत्र हा हितोपदेशाच्या सुमारे ७५% सामग्रीचा प्राथमिक स्रोत आहे, तर त्यातील एक तृतीयांश श्लोक पंचतंत्रात सापडतात. स्वतःच्या प्रास्ताविक श्लोकांमध्ये, नारायण कबूल करतात की ते पंचतंत्राचे आणि 'दुसरे कार्याचे' ऋणी आहेत. नंतरचे पुस्तके अज्ञात आहे परंतु कदाचित ते धर्मशास्त्र किंवा इतर काही असू शकतात. [१]
भाषांतरे
संपादन२० व्या शतकाच्या सुरुवातीस, हितोपदेशाची खालील भारतीय भाषांमध्ये भाषांतरे ज्ञात होती: [१]
- भारताची पूर्वेकडील राज्ये: बांगला, ओडिया
- पाश्चात्य राज्ये: गुजराती
- मध्यवर्ती राज्ये: मराठी
- उत्तरेकडील राज्ये: हिंदी, नेवारी, उर्दू
- दक्षिणी राज्ये: कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू
बर्मी, ख्मेर, थाई, मलय, पर्शियन, सिंहला, तसेच डच, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, स्पॅनिश आणि रशियन यासारख्या आशियाई भाषांमध्ये वेगवेगळ्या शीर्षकांखाली मजकूराचे मोठ्या प्रमाणावर भाषांतर केले गेले आहे. [१]
राजा अकबर (१५४२-१६०५) याने हितोपदेशाचा अनुवाद स्वतःच्या मंत्री अबुल फझल याच्या कामाची प्रशंसा केली. त्यानुसार फझलने हे पुस्तक एका परिचित शैलीत मांडले आणि बुद्धीचा निकष या शीर्षकाखाली स्पष्टीकरणांसह प्रकाशित केले. [४]
हितोपदेश हा ब्रिटिश राजवटीतील विद्वानांचाही आवडता होता. नागरी लिपीमध्ये छापलेले हे पहिले संस्कृत पुस्तक होते, जेव्हा हेन्री कोलब्रुक यांच्या प्रस्तावनेसह विल्यम केरी यांनी १८०३-०४ मध्ये सेरामपूर येथे प्रकाशित केले होते. यानंतर १९व्या शतकात अनेक आवृत्त्या आल्या, ज्यात १८८४ च्या माक्स म्युलरचा समावेश आहे, ज्यात आंतररेखीय शाब्दिक भाषांतर आहे.
खूप आधी, सर विल्यम जोन्स यांना १७८६ मध्ये हे काम आढळले व चार्ल्स विल्किन्स यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले, ज्यांनी भगवद्गीतेचा सर्वात जुना इंग्रजी अनुवाद देखील केला होता. [५] पुना कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य एडविन अरनॉल्ड यांनी केलेले नंतरचे भाषांतर १८६१ मध्ये लंडनमध्ये द बुक ऑफ गुड काउंसेल्स या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. [६]
संदर्भ
संपादन- ^ a b c d e f g S. Narayana (2006). Hitopadesa. Haksar, A.N.D. द्वारे भाषांतरित. Penguin Books. ISBN 978-0-140-45522-9.
- ^ Kaushik Roy (2012). Hinduism and the Ethics of Warfare in South Asia: From Antiquity to the Present. Cambridge University Press. p. 151. ISBN 978-1-139-57684-0.
- ^ Panchatantra: INDIAN LITERATURE, Encyclopaedia Britannica
- ^ Sir Edwin Arnold (1893), The Book of Good Counsels...: From the Sanskrit of "Hitopadesa.", London: W. H. Allen & Co. Limited, page x
- ^ In India Too There Lived An Uncle Remus: Ancient Tales of the Panchatantra Now Appear in English
- ^ Hitopadesa translated by E. Arnold on the Net