वेरवली
वेरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.
भौगोलिक स्थान
संपादनमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लांजा बस स्थानकापासून उत्तरेकडे असलेल्या उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावरून १२ किमीवर हे गाव वसलेले आहे.केळंबे गावानंतर थोडी टेकडी गेल्यानंतर लगेचच वेरवली गाव लागते. वेरवली बुद्रुक व वेरवली खुर्द असे गावाचे दोन भाग पडतात. येथील हवामान हिवाळ्यात थंड, पावसाळ्यात समशीतोष्ण तर उन्हाळ्यात उष्ण असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि काही सखल ठिकाणी तो काही वेळा तात्पुरता साचतो.जमीन कातळाची असल्याने पाऊस लगेच जमिनीत झिरपून जातो.
लोकजीवन
संपादनमुख्यतः मराठा, ब्राह्मण, कुणबी, बौद्ध समाजातील लोकांची येथे पूर्वीपासून वस्ती आहे. लोक अतिशय मेहनती, प्रेमळ, सामाजिक बांधिलकी जपणारे, कष्टाळू, समाधानी, एकोप्याने राहणारे आहेत. भातशेती बरोबरच नागली शेती तसेच दुग्ध व्यवसायही केला जातो. राष्ट्रीयकृत बँकेची येथे शाखा असल्यामुळे भातशेती, दुग्ध व्यवसाय, बकरीपालन, शिवणकाम, इत्यादी व्यवसायासाठी योग्यसमयी माफक दरात कर्जपुरवठा मिळण्याची सोय उपलब्ध आहे.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
नागरी सुविधा
संपादनसार्वजनिक स्वच्छता, रस्ते वीजपुरवठा, आरोग्यसेवा,वेरवली ग्रामपंचायत मार्फत पाहिले जाते. पाण्यासाठी विहिरी, बोरिंगचा वापर केला जातो.