वेण्णास्वामी
वेण्णास्वामी (इ.स. १६२७ - इ.स. १६७८) या समर्थ रामदास स्वामींचा शिष्या व संत कवयित्री होत्या. यांचा जन्म कोल्हापूर येथे देशपांडे नामक एका देशस्थ ब्राह्मण घराण्यात झाला. आठव्या वर्षी मिरज येथील एका तरुणाशी त्यांचे लग्न झाले. पण लग्नानंतर काही दिवसातच त्या विधवा झाल्या. त्यांच्या सासू-सासऱ्यांनी त्यांना लेखन-वाचन शिकवले.
इ.स. १६५० ते १६५६ पर्यंत त्यांनी समर्थ परिवारात शिक्षण घेतले. फक्त त्यांनाच सभेमध्ये उभे राहून कीर्तन करण्याची अनुज्ञा होती.
संदर्भ : भा. सं.को. खंड ९, पृ.५७ ते ५९