वेखंड
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- अत्यंत उग्र दर्प असणारे वेखंड अनेक आजारावरील प्रभावशील ओषध आहे.ते शुल्घ्न,कृमिघ्न व मूत्रल असल्याने पोटदुखी,जंत,लघवीचे आजार यावर फार गुणकारी ओषध आहे.
- पाव ग्रम वेखंडाचे पूड मधासोबत रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्याने सपाटून भूक लागते.
- पोटदुखीचा त्रास होत असल्यास पेलाभर ताकात अर्धा ग्रम वेखंडाची पूड मिसळून व चिमूटभर मिठ घालून ते प्यावे. पोटटुखी कमी होते.
- मोठ्या माणसात अपस्माराचा त्रास असल्यास अर्धा ग्रम वेखंडाचे पूड मध व वेलदोड्याचे चूर्ण घालून दिल्यास फेफरयात लाभदायी ठरते.व आकडी थांबते.
- वेखंडाचे चूर्ण धोतरासारख्या पातळ वस्त्राच्या फडक्यात बांधून ती पोटळी फेफरे आलेल्या रुग्णास हुंगविल्यासतो सावध होतो.
- घरात किंवा घराभोवती साप येत असल्यास त्या ठिकाणी वेखंड कापडात बांधून ठेवल्यास साप उग्र वासामुळे दूर राहतात.