प्रजनन

(वीण या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रजनन' ही सर्व सजीवांमधे आढळणारी, एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची एक जैविक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्याचे संक्रमण होते. त्यामुळे जीवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात.

प्रत्येक सजीव त्याच्या आयुष्यात जन्म, वाढ, विकास आणि मृत्यू अशा अवस्थांतून जातो. एका ठराविक मर्यादेपर्यंत वाढ व विकास होऊन जीव प्रगल्भ अवस्थेत पोहोचल्यानंतर तो प्रजननक्षम होतो. प्रत्येक सजीवाचे आयुष्य मर्यादित असते. प्रगल्भावस्थेनंतर त्याचा ऱ्हास सुरू होऊन कालांतराने त्याचा मृत्यू होतो. परंतु प्रजननामुळे त्याचे गुणधर्म नवीन जीवात संक्रमित झाल्यामुळे ते गुणधर्म टिकून राहातात आणि जीवन सातत्याने चालू राहाते.

प्रजनन प्रकार

संपादन

अलैंगि प्रजनन

संपादन

अलैंगिक प्रजनन ही प्रजननाची प्राथमिक अवस्था आहे. अलैंगिक प्रजननाचे काहीं प्रकार म्हणजे विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन, अनिषेकजनन, खंडीभवन, बीजाणूनिर्मिती, आणि शाकीय प्रजजन. किण्व, यकृतका, पानफुटी, वनस्पतीमधील शाकीय पुनुरात्पादन, अमीबा, पॅरामेशियम मधील द्विखंडीय विभाजन ही अलैंगिक प्रजननाची उदाहरणे आहेत. एकपेशीय सजीवामध्ये बहुघा अलैंगिक प्रजनन होते. अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होत नाही. जिवाणू, कवके आणि काहीं वनस्पति यांच्यामध्ये अलैंगिक पुनुरुत्पादन होते. अलैंगिक प्रजननामध्ये प्रत्येक जीव जननक्षम असतो. त्यामुळे प्रजनन दर वाढतो. मात्र पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अलैंगिक प्रजननामुळे त्या जीवाच्या जाति वैशिष्ठ्यांमध्ये बदल होण्याची क्षमता खुंटते.

लैंगिक प्रजनन

संपादन

दोन एकगुणित युग्मकांच्या संयोगातून द्विगुणसूत्री युग्मनज अशा जीवाची उत्पत्ति म्हणजे लैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजनामध्ये युग्मक निर्मिती होते संयुग्मनातील एका युग्मकास ‘पुंयुग्मक’ किंवा ‘शुक्रपेशी’असे म्हणतात. तर दुसऱ्या युग्मकास ‘स्त्रीयुग्मक’ किंवा ‘अंड’असे म्हणतात. शुक्रपेशी आकाराने लहान आणि चल असतात. अंडपेशी आकाराने मोठी व स्थिर असते. दोन युग्मकांच्या संयोग क्रियेस ‘फलन’ असे म्हणतात. लैंगिक प्रजजन बहुतेक सर्व उच्चस्तरीय प्रगत वनस्पतिमध्ये आणि प्राणीवर्गामध्ये आढळते. शुक्राणू निर्माताजीव आणि अंडपेशीनिर्माता जीव वेगवेगेळे असतील तर त्या जीवांना ‘नर’ व ‘मादी’ असे म्हणतात. युग्मकाच्या अपेक्षेने अशा जीवांना एकलिंगी म्हणतात. असा लिंगभेद नसताना एकच जीव दोन्ही प्रकारची युग्मके निर्माण करू शकत असेलतर त्यास वनस्पतींमध्ये द्विलिंगी (बायसेक्शुअल) आणि प्राण्यांमध्ये ‘उभयलिंगी’ (हर्माफ्रोडाइट) असे म्हणतात. प्रत्येक युग्मक आपल्या माता/पित्यापासून जनुकीय वारसा घेऊन येते. या दोन्ही युग्मकांच्या एकत्र येण्याने जनुकीय द्रव्यामध्ये विविधता येते. जनुकीय विविधता दृश्यप्रारूप विविधतेचे कारक आहे. जेवढी जातिनिहाय विविधता अधिक तेवढी जाति टिकून राहण्यास सक्षम ठरते. लैंगिक प्रजनन असणा-या सजीवामध्ये प्रत्येक दृश्यलक्षणासाठी एक अलील (युग्मविकल्प) कारणीभूत असतो. यातील एक युग्मविकल्प मातेकडून किंवा पित्याकडून वारसाने नव्या पिढीपर्यंत येतो. याचा अर्थ नव्या जन्मणा-या प्रत्येक सजीवाकडे युग्मविकल्पाच्या जोड्या आनुवंशिकतेने आलेल्या असतात. युग्मविकल्पी दोन पद्धतीने कार्य करतात. फक्त प्रभावी युग्मविकल्पाचा परिणाम दृश्यप्रारूपामध्ये दिसतो. लैंगिक प्रजननामध्ये युग्मक तयार होत असल्याने जनुकांची देवाणघेवाण होते. त्यामुळे अप्रभावी युग्मविकल्प प्रकट होत नाही. लैंगिक प्रजननमध्ये दोन जीव आपापली युग्मके एकत्र आणून नव्या जीवाची उत्पत्ति करतात. मात्र दर वेळी जननासाठी दोन सजीवांची आवश्यकता असल्याने जननदर कमी होतो. सक्षम संतति लैंगिक प्रजननातून निपजते. अशा संततीमध्ये जनुकीय दोष कमी असतात. त्यांची आजारापासून बचाव होण्याची क्षमता अधिक असते.

प्रजनन प्रक्रिया

संपादन

हे ही पहा

संपादन