विष्णुभट गोडसे
विष्णूभट गोडसे वरसईकर हे मराठी लेखक होते हे मूळ कोंकणातील पेण तालुक्यातील वरसई गावचे होते. पेशवाईत त्यांच्या कुटुंबीयांकडे पौरोहित्य व प्रशासकीय जबाबदारी होती. मात्र पुढील काळात कर्जबाजारी होऊन या कुटुंबास आर्थिक हलाखीच्या स्थितीस तोंड द्यावे लागले. त्यामुळे १८५७च्या सुमारास ग्वाल्हेरच्या राणी बायजाबाई शिंदे या सर्वतोमुख यज्ञ करणार असल्याचे तेथील आप्तांकडून विष्णूभटांना कळताच ते अर्थार्जनासाठी आपल्या काकांबरोबर ग्वाल्हेरला गेले. या प्रवासाचे वर्णन त्यांनी माझा प्रवास – १८५७ च्या बंडाची हकीकत या पुस्तकात केले. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद शांता गोखले यांनी केला आहे.