विश्व विपस्सना पॅगोडा

मुंबईतील जगप्रसिद्ध ग्लोबल पॅगोडा
(विश्व विपश्यना पॅगोडा या पानावरून पुनर्निर्देशित)

विश्व विपस्सना पॅगोडा (ग्लोबल विपस्सना पॅगोडा) हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे तसेच विपस्सना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे.[] दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट असतात, तर डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना दरम्यानच्या काही दिवसात ही पर्यटक संख्या ५ हजाराच्या वर असते. महाराष्ट्रातील सात आश्चर्ये' निवडलेली आहेत. जून २०१३ मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपस्सना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.[]

विश्व विपस्सना पॅगोडा
सर्वसाधारण माहिती
प्रकार ध्यानकक्ष, पॅगोडा
ठिकाण गोराई, बोरीवली पश्चिम, मुंबई
बांधकाम सुरुवात इ.स. २०००
पूर्ण इ.स. २००८
ऊंची
वास्तुशास्त्रीय ३२५ फूट
बांधकाम
वास्तुविशारद परवेज दुमसिया, एन. आर. वर्मा, चंदूभाई सोमपुरा
रचनात्मक अभियंता नंददीप बिल्डिंग सेंटर (एन.पी.पी.सी.पी.एल.) औरंगाबाद
संदर्भ
http://www.globalpagoda.org/
 
पॅगोड्या समोरील भव्य बुद्ध मुर्ती
 
मुख्य द्वाराचे रात्रीचे दृश्य

एकाच वेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर असून, भूकंपरोधक आहे.

विपस्सना शिबीर

संपादन
 
पॅगोडाच्या आतमधील ध्यान-विपस्सनेचा भव्य कक्ष

पॅगोडामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपश्यना करणाऱ्या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेत सहाय्य करतात आणि मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात.

जाण्यासाठी प्रवासमार्ग

संपादन
 
अरबी समुद्रातून दृश्य

बोरीवली पश्चिमेकडून बेस्टबसने गोराई खाडीजवळ जाणे. तेथून एस्सेल र्वल्डकडे जाणाऱ्या लाँचने पुढचा प्रवास करणे.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ विपश्यना पॅगोडा
  2. ^ "महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा". 2018-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन