"खंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो खड्गपान खंडा कडे Sankalpdravid स्थानांतरीत
प्रस्तावना लिहिली. चित्र घातले.
ओळ १:
[[चित्र:Rajput Khanda.jpg|thumb|right|250px|राजपूत बनावटीचा खंडा]]
'''खंडा''', अर्थात '''खड्ग''', हे [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] हे दुधारी, सरळसोट पात्याचे शस्त्र आहे. ऐतिहासिक काळापासून प्रचलित असलेले हे शस्त्र अनेक ऐतिहासिक भारतीय राज्या-साम्राज्यांनी, तसेच आधुनिक इतिहासकाळातील [[राजपूत लोक|राजपूत]], [[मराठा साम्राज्य|मराठे]], [[जाट लोक|जाट]], [[शीख साम्राज्य|शीख]] इत्यादी लढाऊ जमातींनी सातत्याने वापरले आहे.
 
याचे पाते रुंद असून शस्त्राच्या मुठीपासून टोकाकडे पाते काहीसे रुंदावत जाते. पात्याचे टोक अग्राकडे एकदम वळून संपते. याच्या मुठीच्या बुडापासून एक मोठा काटा पात्याच्या विरुद्ध दिशेने फुटतो. जगभरात अन्यत्र आढळणारी सरळ पात्याची खड्गे प्रामुख्याने अग्राद्वारे भोसकण्यासाठी वापरतात; मात्र खंड्याचा मुख्यत्वेकरून वापर पात्याच्या धारदार कडांनी लक्ष्यास खांडण्यासाठी केला जातो.
 
प्राचीन किंवा ऐतिहासिक कथानकांवर आधारिक नाटका-खेळांमध्ये खंडा व तत्सदृश सरळ पात्याची खड्गे गतकाळाचे चित्र उभे करण्यासाठी आजही दाखवली जातात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[खंडोबा]]च्या व साधारणपणे भारतभरात [[काली]]च्या मूर्ती हातात खंडा घेऊन उभ्या असलेल्या दिसतात. [[शंकर|शंकराचे]] शस्त्र म्हणून [[राजपूत लोक|राजपुतांमध्ये]] खंड्यास वंद्य मानले जाते.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:शस्त्रे]]
 
[[en:Khanda (sword)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खंडा" पासून हुडकले