"विकिपीडिया:वैयक्तिक हल्ले करू नका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो आंतरविकी दुवा (इंग्लिश विपी) घातला
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
कोणत्या स्वरूपाची शेरेबाजी वैयक्तिक हल्ला म्हणून गणली जाऊ शकते, याची सरधोपट अशी व्याख्या करणे अवघड आहे; तरीही काही विशिष्ट स्वरूपाच्या टिप्पण्या निश्चितच अनुचित ठरतात :
* जातीय/धार्मिक/वांशिक/लैंगिक/राजकीय/शारीरिक इत्यादी वैशिष्ट्यांवरून, लैंगिकतेवरून, नागरिकत्व/राष्ट्रीयत्व/रहिवास इत्यादी भौगोलिक वैशिष्ट्यांवरून, वय/शारीरिक क्षमता-अक्षमता इत्यादींवरून एखाद्या सदस्यास हिणवण्याच्या हेतूने किंवा यांपैकी कोणत्याही वैशिष्ट्यावरून बदनामी करण्याच्या हेतूने केलेल्या टिप्पण्या.
* पाळीव प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे सदस्यांबद्दल वापरणे
* एखाद्या सदस्याची नाझी, हुकूमशहा, गुंड किंवा अन्य एखादी कुख्यात व्यक्ती/व्यक्तिरेखा म्हणून संभावना करणे किंवा तत्सम तुलना करणे.
* पुराव्याविना गंभीर आरोप करणे. गंभीर आरोप केल्यास, तितके सज्जड पुरावेही देणे अपेक्षित असते. संपादनांमधील फरक व दुव्यांच्या स्वरूपात पुरावे देता येतात. तसेच काही प्रसंगी संवेदनशील पुरावे अंशतः गोपनीय राखून काही विश्वासार्ह व विवेकी सदस्यांच्या मर्यादित वर्तुळापुरते उघड करता येऊ शकतात.