"माधवराव शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
छो (bad link repair, replaced: १९४५इ.स. १९४५ (18) using AWB)
छो (Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः))
{{अशुद्धलेखन}}
 
'''माधवराव शिंदे''' ([[मार्च १०]], [[इ.स. १९४५]] - [[सप्टेंबर ३०]], [[इ.स. २००१]] ) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. ते [[इ.स. १९७१]], [[इ.स. १९७७]], [[इ.स. १९८०]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[गुणा]] लोकसभा मतदारसंघातून तर [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[ग्वाल्हेर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी [[इ.स. १९८४]] च्या लोकसभा निवडणुकीत [[ग्वाल्हेर]] लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते [[अटलबिहारी वाजपेयी]] यांचा पराभव केला. त्यानंतर ते [[राजीव गांधी]] यांच्या मंत्रीमंडळात [[रेल्वेमंत्री]] होते. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला. त्यानंतर ते [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांच्या मंत्रीमंडळात [[नागरी विमानवाहतूक मंत्री]] आणि [[मनुष्यबळविकासमंत्री]] होते. [[इ.स. १९९६]] साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसबाहेर पडून स्वत:चास्वतःचा मध्य प्रदेश विकास कॉंग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते [[इ.स. १९९६]] च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते कॉंग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. [[सप्टेंबर ३०]], [[इ.स. २००१]] रोजी ते [[लखनौ]] येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना त्यांचे विमान [[उत्तर प्रदेश]] राज्यात [[मैनपुरी]] जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
६३,६६५

संपादने