"कासव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985479 परतवली.
ओळ ८:
 
=== समुद्री कासव ===
समुद्रात राहणाऱ्या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पऱ्यावरणाचापर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यांतील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती [[भारत|भारताच्या]] [[समुद्र किनारा|समुद्री किनाऱ्यावर]] आढळून येतात.
* '''ऑलिव्ह रिडले कासव''' - हे प्रसिद्ध आहे. कासवाचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. भारतात [[ओडिशा]]च्या [[गोहिरमाथा]] समुद्र-किनाऱ्यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही कासवे भारताच्या इतर किनाऱ्यांवरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत. परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. [[कोकण]] किनाऱ्यावरही ही कासवे आढळून येतात.
* '''हिरवे कासव''' (ग्रीन टर्टल) - या कासवाचे पोट गुळगुळीत असते तर पाठ अतिशय टणक असते. पोटाचा रंग पिवळट पांढरा असतो. या कासवांच्या शरीराच्या मानाने डोक्याचा आकार छोटा असतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर यांचा आढळ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कासव" पासून हुडकले