"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
ओळ ११:
रात्रीच्या वेळी राजमार्गावरुन एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठय़ा इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा. ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा. ज्योत ज्या महालासमोरुन चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्याचा त्याचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे आणि इंदुमती पुढे गेल्यावर ती निराशेने काळाठिक्कर पडे. किती योग्य उपमा आहे पाहा ! इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा फुलून येई आणि इंदुमती पुढे जाताच त्याचे वदनकमल म्लान होई. या उपमेवरुन कालिदासाला दीपशिखा कालिदास असे गौरविले जाते.
 
वर्षाचे ३६५ दिवस सूर्य असाच एकेका तिथीच्या समोरून जात असतो. आकाशात सूर्य नसेल तर साम्राज्य काळोखाचेच. चांदणी रात्र असली तरीही त्या चांदण्याला सूर्याच्यासूऱ्याच्या प्रकाशाची सर कशी येणार ? सूर्य ज्या ज्या तिथीला प्रकाशित करून पुढे पुढे जातो ती ती तिथी आनंदाने आणि तेजाने उजळून निघते. आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती म्हणून मानली जाते. कालिदास जयंती म्हणून ओळखली जाणारी ही तिथी कालिदासाच्या स्मरणाने आणि कालिदासाच्या कीर्तितेजाने अशीच उजळून निघते. फरक एवढाच की, स्वयंवरात इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून चालली होती त्याच्या पुढून ती पुन्हा तशी कधीही चालण्याचा योग नव्हता. इथे मात्र प्रतिवर्षी एकेका तिथीला धन्य करीत सूर्य पुढे जात असतो आणि अशा प्रकारे प्रत्येक तिथीला वर्षातून एक दिवस सूर्य उजळून टाकतो. हा दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे कालिदास जयंतीचा. नाहीतरी कालिदास हा संस्कृत वाङमयवितानातील जणू स्वयंप्रकाशी सूर्यच. त्याला कविकुलगुरू म्हणून गौरविले गेले. महाकवी म्हणून सन्मानिले गेले. अजूनही कितीतरी प्रकारांनी त्याचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न झाला. संस्कृत वाङमयाच्या प्रांतात कालिदासासारखा कालिदासच !
 
== काव्ये ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले