"जेम्स हॅडली चेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
ओळ १२:
 
महायुद्धानंतर त्याने एक लघुकथा लिहिली जी गुन्हेगारी वळणाच्या इतर कथांपेक्षा वेगळी होती.तिचे नाव होते " द मिरर इन रूम २२". ही कथा घडते एका जुन्या घरात.त्या घरात एका स्क्वाड्रनचे काही अधिकारी रहात असतात.त्या घराच्या मालकाने आत्मह्त्त्या केलेली आढळून येते व त्याच खोलीत दोन माणसांची गळा चिरून हत्या झालेली असते व त्या प्रत्येकाच्या हातात रेझर असतो.स्क्वाड्रनच्या विंग कमांडरचे म्हणणे असते की तो आरश्यासमोर उभा राहून दाढी करत असताना त्याला आरश्यात एक वेगळाच चेहरा दिसला.त्या चेहर्याने विंग कमांडरच्या गळ्यावर रेझर फिरवला.पण विंग कमांडर वापरत असलेला रेझर नवीन पद्धतीचा असल्यामुळेच तो वाचलेला असतो.ही कथा चेसने त्याच्या खर्या नावाने (रेने ब्रॅबेझोन रेमंड ) १९४६ साली "स्लिप्सस्ट्रीम"मध्ये प्रकाशित केली.
चेसने आपल्या बहुतेक कादंबर्या नकाशे,विश्वकोश,अमेरिकन बोलीभाषेचा शब्द्कोश व अमेरिकन अंडरवर्ल्ड वरील संदर्भग्रंथ यांच्या सहाय्यानेसाहाय्याने लिहिल्या.मायमी व न्यू ऑर्लियन्स मधील थोडा काळ वगळता चेस कधीही अमेरिकेत राहिला नव्हता परंतू त्याच्या बहुतेक कादंबर्यांतील प्रसंग अमेरिकेत घडतात.१९४३ मध्ये गुन्हेगारी जगताविषयी लिहिणाऱ्या रेमंड चॅंडलरने चेसने त्याच्या लिखाणातील मजकूर जसाच्या तसा उचलल्याचा यश़स्वी दावा केला.त्याबद्द्ल चेसला "द बुकसेलर" मध्ये जाहीर माफी मागावी लागली.
चेसच्या कथांमधील पात्रं कोणत्याही मार्गाने श्रीमंत कसे होता येईल ह्या विचाराने पछाडलेली असतात.त्याकरता ती निरनिराळे गुन्हे करतात.मग ते विमा पॉलिसीतील अफरातफर असो किंवा चोरी.आणि त्यात त्यांचे बेत फसतात;त्यात खून पडतात व शेवटी त्या कथेतील नायकास समजते की त्याने जे करायला घेतले होतं ते शेवटी त्याच्याच अंगावर शेकणार हे अगदी स्वाभाविकच होते.चेसच्या कथेतील स्त्रिया सुंदर,चलाख,व बेईमान असतात.त्या आपल्या मार्गात येणाऱ्या व आपण केलेला गुन्हा उघडकीस आणणार्यास ठार करण्यास मागेपुढे पहात नाहीत.चेसच्या कथा विघटीत कुटुंबांभोवती रचल्या गेल्या आहेत.कथेचे शीर्षक रहस्याचा शेवट थोडक्यात व्यक्त करणारे असते.