"ओगदेई खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: he:אוגדיי חאן
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ३७:
|}}
 
[[चंगीझ खान]]चा तिसरा मुलगा ([[इ.स. ११८५]] ते [[इ.स. १२४१]]) व त्याच्या राज्याचा उत्तराधिकारी. चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर [[इ.स. १२२९]] मध्ये याने मध्यमंगोलियावर आपले राज्य चालवण्यास सुरूवात केली. वडिलांप्रमाणेच त्याने अनेक स्वार्‍यास्वाऱ्या व लुटालुट केली. मंगोलियातील काराकोरम या शहराला त्याने आपल्या राजधानीचे शहर म्हणून निश्चित केले.
 
 
== बालपण ==
 
ओगदेई हा चंगीझ खानाच्या चार मुलांपैकी तिसरा मुलगा. लहानपणापासूनच आपल्या शांत, नम्र व समजूतदार स्वभावामुळे तो चंगीझ खानाचा लाडका होता. आपण वडिलांसारखे हुशार नसल्याचे त्याने जोखले होते तरीही आपल्या समजूतदार व चतुर स्वभावामुळे तो इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरत असे. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे लहानपणापासूनच त्याला घोडेस्वारी व युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले होते. चंगीझच्या स्वार्‍यांमध्येस्वाऱ्यांमध्ये त्याला सहभागी केले जात असे. युद्धनीतीत तो तरबेज होता. याचबरोबर आपल्या सैन्याधिकारी, सेनापती यांच्या सल्ले, तक्रारींकडे तो उत्तमरीत्या लक्ष पुरवत असल्याने तो लोकप्रियही होता.
 
== राज्यविस्तार ==
 
चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर [[इ.स. १२२९]]मध्ये भरवण्यात आलेल्या सभेत एकमताने चंगीझच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून ओगदेई खानाची निवड करण्यात आली. स्वत: चंगीझखानाचीही अशीच इच्छा असल्याचे सांगितले जाते. ओगदेईने अनेक स्वार्‍यास्वाऱ्या करून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला.
 
चंगीझ खानाप्रमाणे "गेर"मध्ये न राहता जगात इतरत्र लोक जसे नगरे बांधून राहतात तसेच मंगोलांनी राहावे अशी ओगदेईची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक कारागीर, स्थापत्यशास्त्रज्ञ व अभियंत्याना काराकोरमला नेले व तेथे पक्की बांधकामे करून नगर वसवले. या बांधकामावर युरोपीय व मुसलमानी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. नगरात त्याने चर्च व मशिदी बांधल्या. आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण मुभाही दिली. चंगीझ खानाने मिळवलेली बरीचशी लूट त्याने या नगरावर व इतर बांधकामांवर तसेच व्यापारावर खर्च केल्याने अधिक लूट मिळवण्यासाठी त्याला पुन्हा स्वार्‍यास्वाऱ्या करणे भाग होते.
 
चीनमधील [[सुंग]] राज्यकर्त्यांच्या सहाय्याने त्याने चीनमधीलच [[जुर्चेन]] या प्रबळ राज्यवटीवर जोरदार हल्ले करून त्यांची राजधानी ताब्यात घेतली. [[इ.स. १२३४]]मध्ये त्याने जुर्चेन राज्याचा नि:पात केला. त्यानंतर त्याच्या अधिपत्याखाली चीनविरुद्ध सुरू करण्यात आलेले युद्ध त्याच्यानंतरही सुमारे ४५ वर्षे चालले व संपूर्ण चीन मंगोल फौजांच्या ताब्यात आला. त्याच्या फौजांनी कोरियाला आपले मांडलिक बनवले, मध्य आशिया व युरोपमध्ये [[रशिया]], [[हंगेरी]], [[पोलंड]]वर स्वार्‍याहीस्वाऱ्याही केल्या. त्यापुढे जाणे मात्र ओगदेईच्या मृत्यूमुळे रहित करण्यात आले.
 
== मृत्यू ==
 
इ.स.१२४१ मध्ये ओगदेई खानाचा अतिमद्यपान व संधीवाताच्या दुखण्याने मृत्यू झाला. आपल्या पश्चात आपला बेजबाबदार व ऐशोआरामाला चटावलेला मुलगा [[गुयुक खान]] गादीवर बसावा अशी ओगदेईची इच्छा नव्हती. त्याने जीवंतपणी आपला उत्तराधिकारी न निवडल्याने त्याची पत्नी व गुयुक खानाची आई [[तोरेगीन खातून]]ने काही काळ राज्यकारभार सांभाळला. पुढे [[इ.स. १२४५]] मध्ये तिने आपल्या मुलाला गुयुक खानाला गादीवर बसवले. ओगदेईच्या बाजूने लढणार्‍यालढणाऱ्या रशियामधील जोचीच्या मुलाला [[बाटु खान]]ला ही निवड मान्य नव्हती. त्यामुळे गुयुक व बाटु यांच्यातील बेबनाव वाढत होता. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी [[इ.स. १२४८]]मध्ये गुयुक खान बाटुच्या भेटीस जात असता त्याचा वाटेत मृत्यू झाला. यानंतर सत्ता [[तोलुई खान]] याचा पुत्र [[मोंगके खान]] याच्या ताब्यात गेली.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओगदेई_खान" पासून हुडकले