"दिनकर नीलकंठ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३४:
दिनकर देशपांडे यांनी नागपूरला अशोक प्रकाशन व उद्यम प्रकाशन या संस्थांत काही दिवस नोकरी केली आणि नंतर, नागपूर पत्रिका, लोकमत आणि दैनिक महाराष्ट्र या वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता केली. दिनकर देशपांडे विदर्भातील साहित्य आणि वृत्तपत्र क्षेत्रातील एक रसिक व्यक्तिमत्त्व होते. दिनकर‘राव’ जेवढे रसिक तेवढेच कलंदर. साहित्य असो की पत्रकारिता, एका कलंदर वृत्तीनेच त्यांनी शेवटपर्यंत वाटचाल केली. स्वतःच स्वतःच्या नावाच्या शेवटी ‘राव’ हा शब्द जाणीवपूर्वक लावायचा, तो तेवढ्याच जाणीवपूर्वक खास वैदर्भी ठसक्यात उच्चारायचा हे दिनकर‘रावां’चे खास वैशिष्ट्य होते. त्यातून त्यांचा वऱ्हाडी मोकळा ढंग आणि उमदा खेळकर स्वभावही दिसायचा. मिष्किली हा त्यांचा स्वभाव होता. तो त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणातून, सदरांतूनही उतरला. अर्थात, त्याचा वापर कुणाला दुखावण्यासाठी त्यांनी कधी केला नाही. त्यांची [[बाल नाट्य|बालनाट्यावर]] अविचल निष्ठा होती. त्यामुळेच ते शंभराहून अधिक [[बाल नाट्य|बालनाट्ये]] लिहू शकले. नाटकाच्या आवडीपोटी त्यांनी नागपूरला अभिनयाची नाट्यशाळा चालवली होती. त्यांची बहुसंख्य [[बाल नाट्य|बालनाट्ये]] [[सुधा करमरकर]] यांच्या लिटिल थिएटर (बालरंगभूमीने) रंगमंचावर सादर केली आणि बालरंगभूमी गाजवली. त्यांनी याशिवाय प्रौढांसाठी विनोदी लेखसंग्रह, कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी अन्य बालसाहित्याचीही निर्मिती केली आहे.
 
बालसाहित्य आणि बालरंगभूमीतील भरीव योगदानाची पावती म्हणूनच दिनकर देशपांडे यांना ठाणे येथे भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन|बालकुमार साहित्य संमेलनाच्या]] अध्यक्षपदी एकमताने निवडण्यात आले होते. बालनाट्य लेखनासाठी राज्य शासनासाठी देण्यात येणारा राम गणेश गडकरी पुरस्कार दोनदा मिळविण्याचा बहुमान मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक आहेत.
 
==दिनकर देशपांडे यांची बालनाट्ये ==
ओळ ४४:
==सन्मान आणि पुरस्कार==
 
* दिनकर देशपांडे हे १९९३ साली ठाणे शहरात झालेल्या [[अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन| बालकुमार साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
* दिनकर देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा बालनाट्य लेखनासाठीचा राम गणेश गडकरी पुरस्कार दोनदा मिळाला आहे.