"हारुकी मुराकामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३३:
'''हारुकी मुराकामी''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 村上 春樹 ; [[रोमन लिपी]]: ''Haruki Murakami'' ;) ([[जानेवारी १२]], [[इ.स. १९४९]] - हयात) हा जपानी लेखक व अनुवादक आहे. त्याचे साहित्य समीक्षकांनी नावाजले आहे, तसेच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याच्या 'काफ्का ऑन द शोअर' या कादंबरीला 'फ्रान्झ काफ्का पुरस्कार मिळाला असून जेरुसलेम पुरस्काराचाही तो मानकरी आहे.
 
सद्यकालीन साहित्यिकांमध्ये त्याला मान आहे ''द गार्डियन'' दैनिकाने त्याच्या साहित्यकृती व पुरस्कारांमुळे "आज हयात असणार्‍याअसणाऱ्या जगातील थोर साहित्यिकांपैकी एक" म्हणून त्याला गौरवले आहे.
 
== जीवन ==
दुस‍र्‍यादुस‍ऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जपानात मुराकामीचा जन्म [[क्योतो]] येथे झाला. त्याचे बालपण शुकुगावा (निशिनोमिया), अशिया, कोबे येथे गेले. त्याचे आजोबा (वडिलांचे वडील) हे बौद्ध पुरोहित होते व आईचे वडील [[ओसाका|ओसाक्यातले]] एक व्यापारी होते. त्याचे आईवडील दोघेही जपानी साहित्य शिकवत असत.
लहानपणापासूनच मुराकामीवर पाश्चिमात्य विचारसरणीचा, विशेषतः पाश्चिमात्य संगीत व साहित्याचा जबरदस्त पगडा होता. अमेरिकन लेखकांची पुस्तके वाचत तो लहानाचा मोठा झाला. त्याच्यात व इतर जपानी साहित्यिकांमध्ये हा मोठा फरक दिसून येतो.
ओळ ४२:
[[तोक्यो]] येथील वासेदा विद्यापीठात त्याने नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. तेथेच त्याची व पत्नी योको हिची प्रथम गाठ पडली. त्याने पहिली नोकरी एका रेकॉर्ड दुकानात धरली. (नॉर्वेजियन वूड या त्याच्या कादंबरीतले एक मुख्य पात्र, तोरू वातानाबेदेखील तेथेच नोकरी करताना दाखवला आहे.) अभ्यासक्रम संपत आलेला असतानाच मुराकामीने त्याच्या पत्नीच्या साथीने 'पीटर कॅट' नावाचे एक कॉफीहाऊस (जे संध्याकाळी जाझ बार असे) कोकुबुंजी, तोक्यो येथे सुरू केले. हा बार त्यांनी [[इ.स. १९७४]]पासून [[इ.स. १९८१]]पर्यंत चालवला.
 
त्याच्या बहुतांश कादंबर्‍यांतीलकादंबऱ्यांतील मध्यवर्ती संकल्पना व शीर्षके ही शास्त्रीय संगीताशी निगडित असतात. उदा. द वाइंड-अप बर्ड क्रॉनिकलातील तीन पुस्तके. यांपैकी 'द थिविंग मॅगपाय' रोझिनीच्या ऑपेरा ओव्हरशरावर बेतले आहे, 'बर्ड अ‍ॅज प्रॉफेट' हे रॉबर्ट शुमन याच्या [[इंग्लिश भाषा|इंग्लिशीत]] द प्रॉफेट बर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पियानो संगीताच्या तुकड्यावर आधारित असून 'द बर्ड कॅचर' हे मोझार्टाच्या द मॅजिक फ्लूट या ऑपेर्‍यातल्याऑपेऱ्यातल्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.
 
मुराकामी हा मॅराथॉन व ट्रायथलॉन धावपटू आहे. त्याने वयाच्या तेहतिसाव्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. [[जून २६]], [[इ.स. १९९६]] साली त्याने पहिली अल्ट्रामॅराथॉन (होक्काइडो येथील सरोमा सरोवराभोवतीची १०० किलोमीट‍रची शर्यत) पूर्ण केली. त्याच्या धावण्यासंबंधी त्याने [[इ.स. २००८]] साली प्रकाशित केलेल्या त्याच्या ''व्हॉट आय टॉक अबाऊट व्हेन आय टॉक अबाऊट रनिंग'' या पुस्तकात लिहिले आहे.