"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १६८:
रक्त संचरण (ट्रांस्फ्यूजन) ही ‘हिमॅटॉलॉजी’- रक्तशास्त्रामधील एक विशेष शाखा आहे. या मध्ये रक्तगट, रक्तपेढ्या, रक्तसंचरण सेवा, आणि इतर रक्त उत्पादने यांच्या अभ्यासावर भर दिला जातो. जगभरात रक्त उत्पादने मान्यताप्राप्त डॉक्टराने इतर औषधाप्रमाणे निर्देशित करावयाची असतात.
 
रक्तपेढ्यामध्ये दात्यांचे रक्त जमा करणे, रुग्णाच्या रक्ताबरोबर ते अनुरूप आणि सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी लागते. जर अनुरूप नसलेले रक्त रुग्णास दिले गेले तर रक्त पेशी विघटन, वृक्क निकामी होणे आणि शॉक (वैद्यकीय शॉक) वा मृत्यू असे गंभीर परिणाम होतात. प्रतिपिंड रक्तपेशी पेशीपटलावर परिणाम करून संचरण केलेल्या दात्याच्या रक्तपेशी नष्ट करते. उपचाराचा भाग म्हणून रक्त संचरणाचा सल्ला दिला असल्यास रक्तपेढीमधून आणलेले रक्त स्वत:च्यास्वतःच्या रक्तगटाशी अनुरूप आहे की नाही त्याची प्रत्येक पातळीवर खात्री करून घेतत्यास रक्तातील पेशी विघटनाचा गंभीर धोका टळतो. सुरक्षिततेसाठी दाता आणि रुग्ण या दोघांचे रक्त परस्परास अनुरूप असल्याची रक्तपेढीमध्ये खात्री करून घेतली जाते. या पद्धतीस क्रॉस मॅच असे म्ह्णतात. तातडीच्या वेळी रक्त देण्याची वेळ आलीच तर फक्त रक्त गट एक आहे एवढी खात्री करवून दात्याचे रक्त रुग्णास देण्यात येते. रक्त क्रॉस मॅच करण्यासाठी रुग्णाचा रक्तरस (सीरम) आणि दात्याचे रक्त एकत्र मिसळून इन्क्युबेटरमध्ये ठेवून सूकक्ष्मदर्शकाखाली परीक्षण करतात. रक्त अनुरूपता नसल्यास रुग्णाच्या सीरम आणि दात्याच्या रक्तमिश्रणात सूक्ष्म गुठळ्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. या प्रकारास प्रसमूहन (अग्लुटिनेशन) म्ह्णतात. रक्तामध्ये प्रसूहन झाल्याचे दिसल्यास दात्याचे रक्त रुग्णास देता येत नाही. रक्तपेढी दात्यानी दिलेल्या रक्ताची चाचणी करून रुग्णास देण्यास जबाबदार आहे. रक्तगट, रक्त किती दिवसापासून पेढीमध्ये दिले आहे, दात्याचे रक्त हिपॅटायटिस बी, एचआयव्ही, कुष्ठरोग असे जिवाणू, विषाणूंचे वाहक नाही याचे खात्री रक्तपेढ्या करतात. एकदा रक्त सुरक्षित आहे याची खात्री झाल्यानंतर ते रक्तगटाप्रमाणे वर्गवारी करून साठवून ठेवले जाते. साठवलेल्या रक्ताच्या युनिटवर ISBT 128 पद्धतीने बारकोड लेबल चिकटवणे बंधनकारक आहे.
अमेरिकन संरक्षण दलातील व्यक्तींच्या गळ्यातील आयडेंटिफिकेशन बिल्ल्यावर रक्तगटाचे उठावरेखन (एंबॉस) किंवा शरीरावर रक्तगट गोंदलेला असतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन स्टॉर्म ट्रुपर्सच्या शरीरावर रक्तगट गोंदलेला असे. याचा उपयोग तातडीच्या वेळी योग्य त्या रक्तगटाचे रक्त त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी होतो. भारतात ड्रायव्हिंग लायसेंन्स, संरक्षण सेवा दल, अग्निशमन दलाच्या ओळखत्रावर रक्तगट नोंदवणे आता बंधनकारक आहे.
दुर्मीळ रक्तगटाचे रक्त उपलब्ध होणे ही रक्तपेढीच्या दृष्टीने कठीण गोष्ट् आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीमध्ये डफी निगेटिव्ह रक्तगटाचा आढळ अधिक संख्येने आहे. डफी निगेटिव्ह रक्तगट इतर वंशाच्या व्यक्तीमध्ये दुर्मीळ आहे. आफ्रिकन वंशाची व्यक्ती पूर्व आशियामध्ये प्रवासास गेल्यास गंभीर प्रसंग ओढवू शकतो. कारण पूर्व आशियामध्ये डफी निगेटिव्ह रक्तगट अति दुर्मीळ आहे. अशा वेळी रक्तपेढ्याना स्वयंसेवी पाश्चिमात्य रक्तदात्यांच्या सेवेवर अवलंबून रहावे लागते.
ओळ १९३:
अशा समजांचा प्रारंभ जपानमध्ये 1927 मध्ये झाला. रक्तगटानुसार व्यक्तिमत्व, आणि वर्तन याचा संबंध असतो असा जपानमध्ये चालू झालेल्या संबंधांच्या समजुती आशिया आणि तैवानमध्ये पसरत गेल्या. शास्त्रीय वंशवाद असे या प्रकारास म्ह्णतात. 1927 मध्ये काहीं मानसशास्त्राज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यावेळी आस्तित्वात असलेल्या सैनिकी शासनाने उत्तम सैनिकांची पैदास व्हावी हा उद्देश्य पुढे ठेवून हा रिपोर्ट मान्य केला. 1930 मध्ये हा रिपोर्ट फेटाळला गेला. पण 1970 साली एका रेडियो वरून मसाहिनो नोमि नावाच्या शास्त्रीय अभ्यास नसलेल्या एका प्रसारकाने तो आणखीएकदा प्रसिद्ध केला.
'''बॉम्बे दृश्यप्रारूप रक्तगट'''
एका अत्यंत दुर्मीळ बॉम्बे रक्तगटामध्ये (hh) प्रतिपिंड एच तांबड्या पेशीवर दृशप्रारूप होत नाही. एच प्रतिपिंड ए आणि बी प्रतिपिंडाचे पूर्वगामी स्वरूप आहे. एच प्रतिपिंड नसणे म्हणजे रक्तपेशीवर ए आणि बी प्रतिपिंडाचा अभाव ( ओ रक्तगटाप्रमाणे पेशीवर प्रतिपिंड नसतात) . एच प्रतिपिंड नसले तरी त्यांच्या रक्तात एच , ए आणि बी प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य मात्र तयार होते. ओ रक्तगटाचे रक्त त्याना द्यावे लागल्यास एच प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य तांबड्या पेशींचे विघटन करते. त्यामुळे बॉंबे रक्तगटाच्या रुग्णाना फक्त इतर (hh)दात्याकडूनच रक्त घ्यावे लागते. ते स्वत:स्वतः ओ रक्तगट असल्यासारखे रक्तदान करू शकतात. या रक्तप्रकारास रक्तशास्त्रामध्ये बॉंबे दृशप्रारूप रक्तगट असे नाव आहे.
'''कृत्रिम रक्त'''
एप्रिल 2007 मध्ये नेचर बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधाप्रमाणे ए, बी, एबी रक्तगटाचे रक्त ओ रक्तगटामध्ये रूपांतर एका सोप्या परिणामकारक पद्धतीने करता येते. एका जिवाणूतील ग्लायकोसायडेझ विकरामुळे रक्तपेशीवरील प्रतिपिंड काढून टाकणे शक्य झाले आहे. ए आणि बी प्रतिपिंड काढल्याने –हीसस प्रतिपिंडाच्या प्रश्नावर अजून उपाय सापडला नाही. प्रत्यक्ष व्यक्तीवर उपचार करण्याआधी याच्या पुरेशा चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले