"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पूर्वानुमान: {{संसर्गजन्य रोग}}
छोNo edit summary
ओळ ७:
बालकांना होत असलेला, एक अपंग करणारा रोग.
 
'''पोलियो''' अथवा '''पोलियोमायलिटिस''' हा एक [[विषाणू|विषाणूंमुळे]] होणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो (πολίός) म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन (µυελός) म्हणजे [[मज्जारज्जू]], तर -आयटिस (-itis) म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी बाबतीत हा विषाणू [[मध्यवर्ती मज्जासंस्था|मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये]] प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभतू असणार्‍याअसणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.
 
हजारो वर्षे पोलियो सक्रीय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. [[इ.स. १८८०|१८८०]] नंतर पोलियोच्या साथींचे [[युरोप|युरोपामध्ये]] मोठे उद्रेक होऊ लागले, आणि नंतर लगेचच [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. [[इ.स. १९१०|१९१०]] पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला. पोलियाच्या लसी विकसित करण्याचे श्रेय [[जोनस सॉल्क]] ([[इ.स. १९५२|१९५२]]) व [[अल्बर्ट सेबिन]] ([[इ.स. १९६२|१९६२]]) यांच्याकडे जाते. यांच्या प्रयत्नांमुळे पोलियोच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्षी अनेक लाखांवरून काही हजारांवर आली आहे. [[विश्व स्वास्थ्य संघटना]] (WHO), [[युनिसेफ]] व [[रोटरी इंटरनॅशनल]] या संस्थांच्या पोलियो निर्मूलनाच्या प्रकल्पांमुळे पोलियोचे जगातून लवकरच संपूर्ण उच्चाटन होईल अशी आशा निर्माण झाली आहे. [[इ.स. २०००|२०००]] मध्ये प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील [[चीन]] आणि [[ऑस्ट्रेलिया]] मिळून इतर ३६ देशांमध्ये पोलियोचे निर्मूनल झाले. [[इ.स. २००२|२००२]]मध्ये युरोप पोलियोमुक्त जाहीर करण्यात आला. आता ([[इ.स. २००६|२००६]] नंतर) पोलियोच्या साथींचे उद्रेक फक्त [[भारत]], [[पाकिस्तान]], [[नायजेरिया]], व [[अफगाणिस्तान]] या चार देशांमध्येच आढळून येतात.
ओळ १३:
 
पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात किंवा पोलिओ या नावाने ओळखले जाते. अतंता संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता सस्थेवर परिणाम करतो. लक्षणामध्ये सौम्य पक्षाघात विरहित किंवा पूर्ण पक्षाघात असे सर्व परिणाम काहीं तासात या आजारामुळे होतात.
वर्णन : एकूण तीन पोलिओच्या विषाणूमुळे पोलिओ होत असल्याचे माहीत आहे. एंटेरोव्हायरस या एकाच जातीमधील या विषाणूचे तीन प्रकार हे अन्नमार्गामधील विषाणू आहेत. टाइप 1 या पोलिओ विषाणूमुळे आलेल्या साथीने बहुतेक रुग्णाना पक्षाघात होतो. एरवी हा विषाणू निरुपद्रवी मानवी परजीवी आहे.याचे संख्याशास्त्रीय अंदाज थोडे भिन्न आहेत. काहीं जणांच्या म्हणण्यानुसार दर 200 पैकी एका मध्ये पक्षाघाताची लक्षणे तर दुस-यादुसऱ्या अंदाजानुसार दर 1000 संसर्गापैकी एका रुग्णास विषाणू मध्यवर्ती चेता संस्थेपर्यंत पोहोचल्याने पक्षाघात होतो. जेंव्हा विषाणू मध्यवर्ती चेता संस्थमध्ये प्रवेश करतो तेंव्हा मज्जारज्जूमधील प्रेरक चेतापेशी आवरण दाह होतो. प्रेरक चेतापेशी नष्ट होतात. यामुळे स्नायूकडे संवेद पाठविणे थांबते. स्नायूंकडे आलेले संवेद थांबल्यामुळे स्नायू आकुंचन पावणे थांबते. स्नायू शिथिल होतात. पोलिओमधील हा नेहमीचा प्रकार आहे. पोलिओ विषाणूमुळे किती चेतापेशी बाधित झाल्या आहेत त्यावर पक्षाघाताची तीव्रता अवलंबून आहे. बहुतेक वेळा अवयवांच्या स्नायूवर परिणाम होतो. पोटाचे आणि पाठीचे स्नायू बाधित झाले असल्यास उभे राहण्याची ढब बदलते. मानेच्या स्नायूवर परीणाम झाला असल्यास मान हलवणे आणि डोके उचलणे कठीण होते. चेह-याच्या स्नायूंचा पक्षाघात असल्यास चेहरा वेडावाकडा होणे आणि पापण्या खाली पडणे असे परिणाम दिसतात. घशाचा पक्षाघात झाल्यास श्वासोच्छ्वास थांबून मृत्यू ओढवतो.
पोलिओ विषाणूचा मानव हा एकमेव पोषिता आहे. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. पण पोलिओ प्रौढाना होऊ शकतो. पोलिओचे कारण दाट लोकवस्ती आणि निकृष्ट राहणीमान व स्वच्छतेचा अभाव हे आहे. अशा वातावरणात पोलिओ सहज पसरू शकतो. पोलिओचा धोका वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकारा शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, नुकत्याच टॉन्सिल काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती याना अधिक असतो.
==कारणे आणि लक्षणे==
 
आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्याने पोलिओ पसरतो. क्वचित रुग्णाच्या विष्ठेने दूषित झालेले अन्न आणि रुग्णाच्या लाळेशी संबंध आल्याने पोलिओ होऊ शकतो. थोडक्यात पोलिओ दूषित पाणी आणि अन्नामधून पसरतो. घाण गटारी, आणि दूषित अन्न यामधून पोलिओचा प्रसार होतो. तोंडावाटे शरीरात शिरलेल्या विषाणूची पुढील वाढ घशातील लसिका ग्रंथीमध्ये होते. एक आठवडाभर विषाणू येथेच असतो. या कालखंडामध्ये विषाणू अन्नमार्गाच्या रक्त आणि रसवाहिन्यामधून शोषला जातो. त्याची पुढील वाढ येथेच होते. यास सर्वाधिक सतरा आठवड्यांचा काळ लागतो. एकदा षोषला गेल्यानंतर विषाणू शरीरभर पसरतो. शरीरामधून मज्जारजू आणि केंद्रीय चेतासंस्थेमध्ये त्याचा प्रवेश होतो. एकाकडून दुस-याकडेदुसऱ्याकडे विषाणू पसरण्याचे एक कारण म्हणजे अस्वच्छ हात. जेवण्यापूर्वी जेवल्यानंतर, शौचानंतर हात घुतल्याने पोलिओ विषाणूचा प्रसार थांबतो. जोपर्यंत विषाणू घाणीत आहे तोपावेतो विषाणू घशात किंवा शौचामध्ये जिवंत राहतो. आजाराचे दृश्य परिणाम दिसण्यास तीन ते एकवीस दिवस लागतात.पण लक्षणे दिसू लागल्यानंतर सात ते दहा दिवसात पोलिओ होतो.
विषाणू संसर्गाच्या दोन पद्धती आहेत. एक सौम्य आजार निर्माण करणारा आणि एक गंभीर आजाराचा . (पक्षाघातनज्य आणि पक्षाघात विरहित). सौम्य आजार 80-90% टक्के व्यक्तीना होतो. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. आजाराच्या लक्षणामध्ये थोडा ताप, अशक्तपणा, घसा खवखवणे आणि उलट्या होतात. ही लक्षणे विषाणू संसर्ग झाल्यानंतर तीन ते पाच दिवसात दिसू लागतात. सौम्य आजार 24-72 तासात बरा होतो. पूर्वीच्या सौम्य आजाराची लक्षणे आधी दिसत असल्यास गंभीर स्वरूपाचा पोलिओ होतो. शक्यतो मोठ्या वयाच्या मुलाना आणि प्रौढाना गंभीर आजार होतो.
 
ओळ २४:
एक ट्कका रुग्णामध्ये आजार गंभीर स्थितीमध्ये जातो. त्याला पोलिओ होतो. दोन ते तीन दिवस त्याला कोणतीही पोलिओची लक्षणे जाणवत नाहीत. पोलिओची पूर्वलक्षणे न दिसता एकाएकी पोलिओ होण्याआधी तीव्र डोकेदुखी, पाठदुखी आणि माना दुखी सुरू होते. पोलिओ विषाणूच्या तडाख्यात मुख्य प्रेरक चेता आल्याने ही लक्षणे दिसतात.स्नायूंच्या हालचालीस या प्रेरक चेता कारणीभूत आहेत. विषाणूमुळे चेतांचा दाह आणि चेता नष्ट होतात. स्नायूना प्रेरक संवेद न मिळाल्याने स्नायू दुर्बल, शिथिल होतात. याचा शेवट स्नायूंच्या पक्षाघातामध्ये होतो. स्नायूंचा सामान्यपणा नष्ट झाल्याने अवयव शिथिल होतात. .काहीं दिवसानी स्नायू आकाराने लहान होतात. अशी स्थिती शरीराच्या दोन्ही बाजूस असल्यास द्विपारश्वसममित आणि एकाच बाजूस असल्यास एका बाजूचे अवयव काम करीत नाहीत. पक्षाघात झालेल्या अवयवामधील संवेदनामध्ये फरक पडत नाही.
 
पोलिओ विषाणूचा प्रवेश मज्जास्तंभामध्ये ( मेंदू आणि मज्जारजू याना जोडणारा मेंदूचा महत्वाचामहत्त्वाचा भाग ) झाल्यास रुग्णाचे श्वसन आणि गिळण्यास त्रास होतो. मज्जास्तंभावर तीव्र परिणाम झाल्यास ह्रदयक्रिया रक्तदाब यावर परिणाम होतो आणि मृत्यू ओढवतो.
पक्षाघाताची शेवटची स्थिति थोड्याच दिवसामध्ये येते.ज्या चेतावर विषाणूचा प्रभाव पडला नाही त्या बिघाड झालेल्या चेतांचे कार्य आपापल्या परीने सुधारून घेतात. त्यांच्या नव्या शाखा नष्ट झालेल्या चेतांचे कार्य करतात. सुदैवाने चेतापेशी पूर्नपणे नष्ट झालेल्या नसल्याने महिन्याभरात प्रेरक आणि संवेदी चेता कार्य करू लागतात. सहा महिन्यांच्या काळात रुग्ण पूर्ण बरा होतो. चेतापेशीवर कायमचा परिणाम झाला असल्यास कायमचा पक्षाघात राहतो.
== निदान==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले