"जिम कॉर्बेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
जिम कॉर्बेट यांच्या दूर दृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून [[अभयारण्य|अभायारण्ये]] घोषीत करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली [[राष्ट्रीय उद्यान]] घोषीत करण्याचा मान स्वतः जिम यांचाच. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली [[कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान]] असे नामांतरण करण्यात आले.
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|एलिझाबेथ द्वितीय]] हजर होती. ते दोन दिवस सगळ्यांनी आनंदात घालविले. त्या दिवसांच्या आठवणींविषयी आपल्या ट्री टॉप्स या पुस्तकात जिम लिहितात, "मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली". कारण इंग्लंडचे राजे [[जॉर्ज सहावा, इंग्लंड|जॉर्ज सहावे]] यांचे त्या रात्री निधन झाले.
 
जिम कॉर्बेट यांचा मृत्यू [[एप्रिल १९]], [[इ.स. १९५५]] ला [[केनिया]] मध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला (Indo Chinese Tiger) त्यांचे नाव Panthera tigris corbetti (Corbett's Tiger) देण्यात आले