"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५:
 
===कर्‍हामाई===
पांडेश्वर येथे द्रौपदी व कुंतीमातेसह पांडव वास्तव्य करून रहात असत, सदर भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते. भगवान श्रीकृष्णाने पांडवाना या स्थळी भेट दिली असताना त्यांनी या भागात पाण्याची टंचाई दूर करण्यासंबंधी विनविले. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने असे सुचविले की, गराडे येथे ब्रह्मदेव जलपूर्ण कमंडलू घेऊन बसले आहेत. तो कमंडलू कलांडून दिल्यास त्यातून निर्माण होणार्‍याहोणाऱ्या धारेतून सरित वाहिल. भीम ब्रम्हदेवापाशी जाऊन त्याने समाधिमग्न असलेल्या चतुराननास जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला. ब्रम्हदेव समाधीतून जागे होईनात. नाईलाजाने शेवटी ब्रम्हदेवास सावध करण्यासाठी भीमाने ब्रह्राच्या मस्तकावर शीतल पाण्याचा कमंडलू ओतला. ब्रह्माचा कोप होऊ नये या भितीने म्हणून तो पूर्वेस पळत सुटला. त्याच्या बरोबरच त्या करातील पाण्याचा प्रवाहही वाहू लागला, थंडपाण्याच्या स्पर्शाने ब्रह्म जागृत झाला व भीमाच्या मागे लागला. श्रीकृष्णाने पूर्वीच सुचविल्याप्रमाणे भीमाने त्या जलप्रवाहाकाठी शिवभक्त ब्रह्मकरिता पार्थिव शिवलिंग मार्गात तयार केली. ब्रह्मदेव हा शिवभक्त असल्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याखेरीज त्यास मार्ग अक्रमिता येईना. त्यामुळे ब्रह्मदेव शिवलिंगस्थळी थांबत व त्या अवधीत भीम पुढे जाई. भीम व जलप्रवाह पुढे पुढे आणि ब्रह्मदेव मागे मागे अशी ही शर्यत पांडेश्वरी समाप्त झाली, पांडेश्वरी श्री कृष्णासह वर्तमान पांडव यज्ञकर्म आचारीत होते. त्यामध्ये ब्रह्मदेवही सामील झाले, त्यांच्या कमंडलूचे नाव होते कर करामधून जन्मलेली ती कर-जा म्हणजे कर्‍हा भीमाने ज्या ज्या ठिकाणी पार्थिव शिवलिंगे तयार केली त्या त्या ठिकाणी आजही भव्य शिवालये उभी आहेत. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कर्‍हाकाठची शिवालये याच कथेची साक्ष देत आहेत. पांडवांचा यज्ञ संपला परंतु ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून सुरु झालेली कर्‍हा शतके लोटली, युगे लोटली तरी अजूनही कर्‍हा वाहतेच आहे. आणि तीरावरील जीवनमळे फुलवीत आहे.<br /><br />
===कसबे सासवड===
कर्‍हेपठारावर १८०° - २१° उत्तर रेखांश व ७४° - १° पूर्व अक्षांवर सासवड वसलेले आहे. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने या पुण्यभूमीत गहन तप केले. ही भूमी ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली म्हणून तीस त्या काळी '''ब्रह्मपुरी''' म्हणत.<br /><br />
"https://mr.wikipedia.org/wiki/सासवड" पासून हुडकले