"एच.जी. वेल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३४:
हर्बर्ट वेल्स यांचा जन्म [[इंग्लंड]] देशातील [[केंट]] कौंटी मधल्या [[ब्रोमली]] या गावी दि. [[सप्टेंबर २१]] [[इ.स. १८६६|१८६६]] झाला. कनिष्ठ मध्यमवर्गातील जोसेफ वेल्स आणि साराह निल यांचे ते चौथे अपत्य. वडील जोसेफ हे आधी माळी काम करीत असत, काही काळानंतर हर्बर्टच्या जन्मा आधी त्यांनी किराणा मालाचे एक छोटेसे दुकान सुरू केले तर आई साराह ही मोलकरीण म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे. हर्बर्टचे शिक्षण कसेबसेच सुरू झाले. आपल्या कुटुंबाची ओढाताण दिसत असल्याने हर्बर्ट लहानपणी केंट विभागाकडून [[क्रिकेट]] खेळून चार पैसे मिळवित. १८७४ साली एका छोट्या अपघातात त्यांचे पायाचे हाड मोडले, सक्तीच्या विश्रांती काळात वडिलांनी आणून दिलेल्या पुस्तकांमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे शाळेत अनेक शिष्यवृत्ती मिळवून आपला शिक्षणाचा खर्च स्वतःच पेलला. यामुळे पुढे १८९० साली विज्ञान विष्यातील पदवी मिळाल्यानंतर त्यांना विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.
 
शिक्षकी पेशा सोडून हर्बर्ट यांनी पत्रकार म्हणून पॉल मॉल गॅझेट मध्ये लेख, गोष्टी वगैरे लिखाण काम सुरू केले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसे मिळू लागले. १८९१ साली त्यांची चुलत बहीण इसाबेल वेल्सशी हर्बर्ट यांनी विवाह केला मात्र १८९४ साली तिला सोडून अॅमी कॅथरीन रॉबीन्स हिच्याशी लग्न केले. एच. जी. वेल्स हे आपल्या बायकोशी प्रामाणिक राहिले नाहीत, त्यांचे बर्‍याचबऱ्याच मुलींशी संबंध होते. अॅमी रॉबीन्स मात्र शेवटपर्यंत (मृ. १९२७) हर्बर्टशी पूर्ण प्रामाणिक राहिली. दरम्यान एच. जी. वेल्स यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा खप खूप होऊ लागला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे युरोपातील सर्वच भाषांमध्ये भाषांतरे होऊ लागली.
 
पत्नीच्या निधनानंतर एच. जी. वेल्स यांनी राजकारणात प्रवेश केला, तेथे मात्र ते अयशस्वी ठरले. जागतिक महायुधामुळे झालेली प्रचंड हानी पाहून हर्बर्ट खचून गेले, निराशावादी बनले. दि. [[ऑगस्ट १३]] [[इ.स. १९४६|१९४६]] रोजी मधुमेह किंवा यकृताच्या कर्क रोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आजाराविषयी निश्चीत माहिती मिळू शकली नाही.