"ना.घ. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎एक कविता: embedding साचा:मराठी कवी using AWB
ओळ १२:
 
==इतर==
कवी ना. घ. देशपांडे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 रोजी झाला. या दिवशी नागपंचमी होती, म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले. त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता. चित्रकलेचेही उत्तम अंग होते. व्यवसायाने ते वकील होते.
 
LLB करण्याअगोदर मॉरिस कॉलेजमधून त्यांनी बी ए केले (1930). बी ए ला असताना 1929 मध्ये त्यांनी लिहिलेली ‘शीळ’ ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी एन जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे 1932 मध्ये एच एम व्ही ने ती जी एन जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून ‘भावगीत’ हा प्रकार मराठी संगीत विश्वात रूढ झाला. काही वर्षांनी, म्हणजे 1954 मध्ये ‘शीळ’ हा काव्यसंग्रह आला.
 
1964 मध्ये नाघंचा दुसरा काव्यसंग्रह – अभिसार – प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे 1986 मध्ये आलेल्या ख़ूणगाठी या काव्यसंग्रहास साहित्य अकादेमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय ‘कंचनीचा महाल’ (चार दीर्घकवितांचा संग्रह) व ‘गुंफण’ (‘शीळ’ पासूनच्या तोवर अप्रकाशित असलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. 80 च्या दशकात ‘कोल्हापूर सकाळ’ दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आठवणींचे ‘फुले आणि काटे’ हे संकलन – हे त्यांचे गद्य वाङ्मय.
 
नाघंना आयुष्यात बरेच मानसन्मान मिळाले : गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली ‘साहित्य वाचस्पती’ ही उपाधी, इत्यादी. 1984 मध्ये नाघंच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून वि. सा. संघाने मेहकर येथे साहित्य संमेलन आयोजित केले.
 
साहित्य क्षेत्राखेरीज इतरही प्रांतात नाघंनी कार्य केले. मेहकर येथील मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. 1935 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे 1969 ते 2000 या दीर्घ काळात ते अध्यक्ष होते. 1935 पासून 1992 पर्यंत त्यांनी मेहेकरच्या सेशन कोर्टात वकिलीची प्रॅक्टीस केली. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही दांडगा होता.
 
सर्वसामान्यांना ज्ञात नसलेली एक गोष्ट: नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समीतीचे नाघ काही काळ सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर (pitch) पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे. त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला.
 
==बाह्य दुवे==
* [http://beta.esakal.com/2009/05/27233522/pune-NG-Deshpande.html ना. घ. देशपांडे यांनी वेगळी वाट निर्माण केली - महानोर]