"जे.आर.डी. टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎उद्योजक पदभार: ., replaced: एअर → एर (2)
ओळ ५९:
== उद्योजक पदभार ==
 
[[इंग्लिश खाडी]] विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. [[इ.स. १९२९]] साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. [[इ.स. १९३२]] साली त्यांनी ''टाटा एअरलाईन्सएरलाईन्स'' या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे [[इ.स. १९४६]] साली तिचे नाव बदलून [[एअरएर इंडिया]] ठेवले गेले.
 
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे [[इ.स. १९३८]] साली ते ''टाटा सन्स'' उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने [[इ.स. १९५६]] साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.