"सोव्हियेत संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३१:
तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके [[तंबाखू]], [[चहा]], [[ऊस]], [[अंजीर]], [[अक्रोड]], [[बांबू]], [[लवंग]], [[निलगीरी]] ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती.
 
सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी '''ओब''', '''येनिसी''', '''लेना''' व '''अमूर''' या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील '''द्विना''' नदीद्वारे [[बाल्टिक समुद्र]], '''द्नीपर''' व '''डॉन''' या नद्यांद्वारे [[काळा समुद्र]] आणि '''अझोव समुद्र''', [[वोल्गा]] नदीने [[कॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्र]] तर उत्तरेकडील नद्यांद्वारे [[श्वेत समुद्र]] जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते.
 
[[आर्क्टिक महासागर|आर्क्टिक समुद्राचा]] सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला [[कास्पियनकॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्राला]] तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील '''बैकाल''' सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते.
 
विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हर्कोयान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला [[कॉकेशस]] पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच [[पामीर]], तिआनशान आणि [[अलताई]] पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोवियेत संघाचे विभाजन करणार्‍या [[उरल पर्वतरांग|उरल]] पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोवियेत संघास लाभल्या होत्या.