"व्लादिमिर लेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
----
 
[[वोल्गा नदी]] किनार्‍यावरील सिम्बिर्स्क (नंतरचे उल्यानोवस्क) या गावी लेनिनचा जन्म [[२२ एप्रिल २२]] [[इ.स. १८७०|१८७०]] ला झाला. त्यांचे वडील इल्या निकोलायेविच उल्यानोव्ह हे आधी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते नंतर ते शाळा तपासनीस झाले, तर आई मारिया अलेक्सांद्रोव्हना या एका सुविद्य घराण्यातील होत्या. लेनिन सहा भावंडातील तिसरे अपत्य होते. उल्यानोव्ह कुटुंब सुसंस्कृत, सुखी कुटुंब म्हणून परिचित होते. इल्या निकोलायेविच यांना खूप मान होता, तत्कालीन उमराव वर्गात त्यांची गणना होत होती. लेनिनच्या बालपणीचा काळ आरमात व उदार वातावरणात गेला. इतर भावंडांप्रमाणेच लेनिनही हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते. शिक्षणातील शेवटच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी सुवर्णपदक पटकाविली होते. १८८६ साली वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले. १८८७ मध्ये त्सार (मराठी झार) तिसरा अलेक्सांद्र याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून लेनिन यांचा मोठा भाऊ अलेक्सांद्र याला फाशीची शिक्षा झाली आणि मोठी बहीण ऍना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनवर झाला.
 
शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले. पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशी विरोधात केलेल्या निदर्शनाच्या आरोपामुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठातही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८ व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले.