"भौतिकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ne:भौतिक शास्त्र
छोNo edit summary
ओळ ३:
'''भौतिकशास्त्र''' विज्ञानाची एक प्रमुख शाखा आहे.
== इतिहास ==
भौतिकशास्त्र ही नैसर्गिक शास्त्रांपैकी एक फार पुरातन शाखा आहे. यामध्ये [[पदार्थविज्ञान]], [[गतिशास्त्र]], [[ध्वनिशास्त्र]], [[उपयोजित गणित]], [[विद्युत-चुंबकशास्त्र]], [[अणुशास्त्र]], कणशास्त्र, [[ऊर्जाशास्त्र]], [[अंतराळशास्त्रअंतराळ विज्ञान]], [[वातावरणशास्त्र]] या व अशा इतर उपशाखांचा समावेश होतो. ढोबळमानाने, हे नैसर्गिक घटनांमधील कार्यकारणभाव शोधणारे शास्त्र आहे असे म्हणता येईल. यासाठी प्रामुख्याने पदार्थावरील (यात पदार्थाचे अविभाज्य घटक असणारे अणु-रेणु व मूलकण देखील समाविष्ट आहेत) बल व कार्य यांचा अभ्यास केला जातो. तसेच त्यामुळे होणारी हालचाल, मिळणारी ऊर्जा व गती, तसेच या सर्वांचा आजुबाजुच्या परिस्थितीशी असणारा संबंध देखील अभ्यासला जातो. <br /><br />
पुरातन असणारी ही ज्ञानशाखा खगोलशास्त्राच्या त्यातील समावेशामुळे कदाचित सर्वात प्राचीन ठरते. भौतिकशास्त्र त्याच्या [[गणित]] व [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानाशी]] जोडल्या गेलेल्या संबंधांमुळे पूर्वीपासुनच फार जड व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे समजले गेले आहे. परंतु भौतिकशास्त्राचे मानवी प्रगती (विशेषतः गेल्या दोन शतकांमधील) वृद्धिंगत करण्यामागील योगदान मात्र वादातीत व एकमेवाद्वितीय आहे.