"किशनजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
मुळनाव कोटेश्वर राव , (जन्म १० ऑक्टोबर १९५३ मृत्यु ) किशनजी याच नावाने जास्त परिचित असलेला हा जहाल नक्षलवादी नेता होता. नक्षलवादी चळवळीच्या सुरवातीच्या काळापासुन कार्यरत असलेला व जेष्ठ तसेच संघटनेच्या ५ प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जात असे.
पेद्दापल्लीकिशनजीचा जन्म आम्पेद्दापल्ली गावात ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला. करीमनगरमधून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर कोटेश्वर कायद्याची पदवी घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यालयात दाखल झाला. पण त्याचे सारे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे होते. भूमिहीनांना शेतजमिनीचा वाटा मिळाला पाहिजे, यासाठी सुरू केलेल्या या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या हेतूने कोटेश्वररावने १९७३ साली शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना स्थापन केली. सीतारामय्या सोबत याच चळवळीत ओळख झाली. याच वर्षी हे दोघे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. सरकारने ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच हे दोघेही भूमिगत झाले. १९७५ ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली आणि रयतकुली संगमची जबाबदारी कोटेश्वरवर सोपवली. या माध्यमातून कोटेश्वररावने संपूर्ण तेलंगणात संघटना उभारण्याचे काम केले. १९७९ मध्ये निझामाबाद पोलिसांनी त्याला अटक केली व तुरुंगात टाकले. एक वर्ष वरंगलच्या केंद्रीय कारागृहात काढल्यानंतर त्याची सुटका झाली. यानंतर कोटेश्वरने किशनजी असे नाव धारण करुन पीपल्स वॉर ग्रुपच्या कामात स्वत:ला झोकून दिले. नंतर वेगवेगळय़ा राज्यात प्रदीप, प्रल्हाद, मुरली, रामजी, विमल रेड्डी या नावाने किशनजी वावरत राहिला. सीतारामय्याने किशनजीला प्रांत आंध्र प्रदेशाची संघटनात्मक जबाबदारी दिली. तीन वर्षे राज्यात सतत संघटनेचा विस्तार केल्यानंतर किशनजीला छत्तीसगड, महाराष्ट्र व ओरिसा या तीन राज्यांची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर किशनजी ने पुर्व भारतात संघटनेचा प्रसार केला.
{{विस्तार}} {{काम चालू}}
"https://mr.wikipedia.org/wiki/किशनजी" पासून हुडकले