"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Кеңалқым жылан
No edit summary
ओळ २:
'''नाग''' हा विषारी [[साप]] आहे. नागाचा वावर मुख्यत्वे [[आशिया]] व [[आफ्रिका]] खंडातील उष्ण प्रदेशात आहे.
 
नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही [[बरगड्या]] अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखीलदेखिल विविध खूणाखुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
 
नागाचे मुख्य खाद्य हे [[उंदीर]], [[बेडूक]], [[सरडा|सरडे]] इतर छोटे [[प्राणी]] व [[पक्षी]]<ref>[http://www.wildlifeofpakistan.com/ReptilesofPakistan/cobra.htm Spectacled or Indian Cobra, Black Pakistan Cobra, Central Asian/Oxus or Brown Cobra]</ref> आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकर्‍याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रूशत्रु [[माणूस]] आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये [[मुंगुस]], [[गरुड]], [[कोल्हा|कोल्हे]], [[खोकड]], [[अस्वल|अस्वले]] तसेच [[मोर]] इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.<ref>[http://www.wildlife-tour-india.com/indian-wildlife/cobra.html Cobra in India]</ref> . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.
 
== नागाच्या उपजाती==
ओळ २२:
==नागाचे विष==
 
दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात त्यामुळे नागाचे [[विष]] हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखीलदेखिल होउ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे [[संवेदन प्रणाली]]वर neural systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास असमर्थ होतात. जीव मुख्यत्वे [[मेंदू]]द्वारे नियंत्रित [[श्वसन प्रणाली]]चे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते दीड दिवसापर्यंत जाउजाऊ शकतो.
 
===प्रतिविष===
 
नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा [http://www.lfsru.org/firstaid.htm नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार ])प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखीलदेखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते <ref>[http://www.engin.umich.edu/~CRE/web_mod/cobra/avenom.htm Mechanism of antivenom]</ref>.
 
==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान==
 
[[चित्र:Snake in basket.jpg|thumb|200 px|गारुड्याकडील नाग]]
भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात [[श्रावण महिना|श्रावण महिन्यात]] [[नागपंचमी]] साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पुजा करतात व नागाला दूधाचादुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारुडीगारूडी लोक गावागावात फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यामधील]] [[३२ शिराळा]] या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो<ref>[http://www.indianetzone.com/1/nagpanchami.htm Nagpanchami, Indian Festival]</ref>. हजारो नाग या दिवसाकरीता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. अजूनही यावर कायदा केला गेला नाही. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगीतलेसांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.
 
== गैरसमज==
ओळ ३९:
नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे<ref>[http://www.wildlifesos.com/rprotect/snakemyths.htm सापांबद्द्ल गैरसमज]</ref>
 
* नाग दूध पितो- वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे नाग दूध पितपीत नाही.
* नाग गारुड्याच्या पुंगीपुढे नाचतो(डोलतो) - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारुडीगारूडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारुडीगारूडी पुंगी घेउन स्वत: हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.
* नागीणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो.(ग्रामीण भागात याला '''डूख धरणे''' असेही म्हणतात.)
* नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो
ओळ ४७:
 
अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे.
*सर्वांत प्रसिद्ध चित्रपट [[इ.स. १९८६|१९८६]] मधील [[श्रीदेवी]], [[अमरीश पुरी]] व [[ऋषीकपूर]] चा [[नागिन, चित्रपट|नागिन]] आहे ज्यामध्ये श्रीदेवी ही नाग तसेच मानवी रुपरूप धारण करुकरू शकत असते.
*[[जॅकी श्रॉफ]] चा दूध का कर्ज इत्यादी चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे.हा चित्रपट [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]] या मूळ मराठी चित्रपटावरून घेतलेला आहे
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले