"काळा समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ky:Кара деңиз
No edit summary
ओळ १०:
[[इस्तंबुल]] हे [[तुर्कस्तान|तुर्कस्तानातील]] सर्वांत मोठे शहर याच समुद्राच्या काठावर वसलेले आहे. बातुमी, बुर्गास, कोन्स्टांटा, गिरेसुन, होपा, इस्तंबूल, कर्च, खेर्सन, मंगालिया, नावोदारी, नोवोरोस्सिक, ओडेस्सा, ओर्दु, पोटी, रिझे, सामसुन, सेवास्तोपोल, सोची, सुखुमी, त्रा ब्झोन, वार्ना, याल्टा आणि झोगुल्डाक ही या समुद्राच्या काठाने वसलेली काही महत्त्वाची शहरे आहेत.
 
काळा समुद्र ही एक बाह्यप्रवाही जलराशी आहे; म्हणजेच, प्रत्येक वर्षी येऊन मिळणा-यामिळणाऱ्या एकूण पाण्यापेक्षा साधारण ३०० घन कि.मी. इतके जास्त पाणी काळ्या समुद्रातून, बोस्फोरस आणि दार्दनेलस सामुद्रधुनींमार्गे, एजियन समुद्रात जाते.
भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणारे पाणी हे "द्विस्तरीय जलप्रवाह प्रणाली" तयार करते. काळ्या समुद्रातून बाहेर पडणारे जास्त थंड आणि कमी खारट पाणी हे भूमध्य
समुद्रातून काळ्या समुद्रात येणार्‍या पाण्याच्या वर तरंगत राहते, ज्यामुळे पाण्यात खोलवर ऑक्सिजन अभावित पाण्याचा स्तर तयार होतो. काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील युरेशियाई जलप्रणालीतील नद्यांतूनही यात पाणी येते, ज्यातील डॉन, नीपर आणि [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत.
ओळ २७:
वेगवेगळ्या प्रदेशांत/लोक समूहांत सध्या प्रचलित असलेली काळ्या समुद्राची नावे ही नावाची गुणधर्मनिदर्शक भाषांतरे आहेत. अद्यिघे:(Хы ШIуцI), ग्रीक: मावरी थलासा (Μαύρη Θάλασσα), बुल्गेरीयाई: चेर्नो मोरे (Черно море), जॉर्जियाई: शावी झ्ग्वा (შავი ზღვა), लाझ: उचा त्झुगा किंवा फक्त त्झुगा 'समुद्र', रोमनियाई: मारेया नेग्रा, रशियाई: चोर्नोये मोरे (Чёрное море), तुर्की: कारादेनीझ़, युक्रेनियाई: चोर्ने मोरे (Чорне море), ऊबिख़: (ʃʷad͡ʒa).
 
वरील नावे ही इ.स.च्या बाराव्या शतकापूर्वीची आहेत, असे मानले जाते. काळ्या समुद्राला त्याचे नाव हे [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी तुर्कांकडून]] प्राप्त झालेले आहे. मध्ययुगीन तुर्की भाषेत 'कारा (शब्दश: अर्थ: ''काळा'')' या शब्दाचा एक अर्थ ''उत्तर दिशा'' असाही होता. उदाहरणार्थ, 'कारा-देनित्झी' (कारा समुद्र), हा काळ्या समुद्राप्रमाणेच सायबेरियाई याकुत तुर्कांच्या उत्तरेस असणारा एक समुद्र आहे. त्याचप्रमाणे, तुर्कीत 'लाल' हा 'दक्षिण दिशा' या अर्थानेही वापरतात. उदाहरणार्थ, 'लाल समुद्र' जो अनातोलियाच्या दक्षिणेस आहे. याप्रमाणेच 'अक्'-पांढरा पश्चिमेसाठी. प्राचीन अनातोली तुर्कीत (तुर्की भाषेत) एजियन आणि भूमध्य यांना एकत्र 'अक्देनित्झ'-पांढरा समुद्र, असे संबोधत, तर आधुनिक तुर्की भाषेत फक्त भूमध्य समुद्रालाच अक्देनिझ संबोधतात कारण भूमध्य समुद्राच्या उत्तरेकडील भागाला एजियन समुद्र हे पाश्चात्य नावाला अनुसरून नाव देण्यात आले आहे. ओट्टोमन तुर्कांच्या वेळी असे नव्हते, कारण त्या वेळी ओट्टोमन तुर्क एजियन समुद्राला, त्यातील ग्रीस आणि अनातोलिया यांच्या मध्ये असणा-याअसणाऱ्या १२ बेटांचा निर्देश करीत, 'बेटांचा/द्वीपांचा सागर'-अदलर देनित्झी, असे संबोधित.
 
काळा समुद्र हा चार पैकी एक समुद्र आहे, ज्यांची इंग्रजी नावे ही रंगांवर आधारित आहेत. लाल समुद्र, पांढरा समुद्र आणि पिवळा समुद्र हे त्यातील इतर तीन समुद्र होय.