"ऑपरेशन चॅस्टाइझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४७:
सोर्पे धरणाकडे केवळ ३ विमाने पोहचु शकली. इतर विमाने एकतर रस्ता चुकली वा जर्मनांनी ती वाटेतच पाडली. सोर्पे धरणाची परिस्थिती इतर धरणांपेक्षा वेगळी होती. धुके होतेच त्यातच धरणाची भौगोलिक रचना अशी होती की इतर धरणांप्रमाणे सोर्पेच्या मुख्य भिंतीला लंबरेषेत सरळ उडाण करुन बाँब टाकणे शक्य नव्हते. विमानांना तेवढी जागाच नव्हती. यामुळे त्यांनी सोर्पे धरणावर बाँब टाकतांना वेगळी पध्दत वापरली. विमानांनी धरणाच्या भिंतीला समांतर अशा रेषेत उडडाण केले आणि बाँब टाकला. सहाजिकच यावेळी बाँबला जागीच टाकायचे असल्याने त्यांना फिरक्या देण्याची गरजच नव्हती त्यामुळे बाँबना फिरक्या न देताच टाकण्यात आले. मॅकार्थी , ब्राउन, अँडरसन या तिघांनी सोर्पे वर हल्ला केला.
पहिला प्रयत्न मॅकार्थीने केला पण त्याचे गणित जमले नाही. त्यातच त्याचे विमान समोरील बाजुच्या टेकडीवर आदळणार होते पण थोडक्यात बचावले. त्याने अजुन ९ प्रयत्न केले. पण बाँब टाकण्याचे जमत नव्हते. अखेर १०व्या प्रयत्नात त्याच्या विमानातील सहकार्‍याने बाँब टाकला. त्यानंतर त्याने विमान वळवुन नुकसानीचा अंदाज घेतला. पण त्याला आढळुन आले की भिंतीला फारच किरकोळ दुखापत झाली पसुन धरण सहीसलामतच होते. याच दरम्यान राखीव दलातील वैमानिकांना सोर्पे कडे जाण्याचे आदेश मिळाले होते. पण बर्पी चे विमान रस्त्यातच जर्मनांनी पाडले व ते सोर्पे जवळ पोहचु शकले नाही. ब्राउन धरणाजवळ आला तोपर्यंत धुके दाट होऊ लागले होते. त्याने अंदाजे बाँब टाकला पण त्याने धरणाला नुकसान झाले नाही. यानंतर अँडरसन पोहोचला पण तोपर्यंत धुके इतके दाट झाले होते की अँडरसनला प्रयत्न करणेही जमले नाही.
 
यानंतर इंग्लंडची विमाने माघारी वळली. परत येतांनाही त्यांनी १०० फुट उंची वरुनच उडडाण केले. पण जर्मनांनीही खोलवर मारा करत आणखी २ विमाने पाडली. प्रत्यक्ष मोहिमेतुन केवळ ९ विमाने परतु शकली. २ विमाने मोहिमे पुर्वीच परतली होती. इतर ८ विमाने एकतर जर्मनांनी पाडली अथवा फार नुकसान होऊन ती कोसळली. त्यातील सैनिकही इंग्लंडला गमवावे लागले. स्कॅम्पटनच्या तळावर ३:११ वाजता पहिले विमान परतले. विंग कमांडर गिब्सन ४:१५ ला परतला. सर्वात शेवटचे विमान सकाळी ६:१५ ला परतले.
 
इंग्लंडला नुकसानीचा पुर्ण अंदाज हवा होता. म्हणुन सकाळ होताच हल्ला केलेल्या जागेचे छायाचित्रण करण्यास विमाने पाठवली गेली.
 
==बाह्य दुवे==