"ऑपरेशन ब्लू स्टार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २०:
==ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई==
 
ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्वाच्या भागात होते. त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाहबेग सिंह यांच्याकडे होते. (शाहबेग सिंह हे पुर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या युध्दात त्यांनी बांगलादेश मुक्तीबाहिनी च्या सभासदांना प्रशिक्षित केले होते. त्यांनी भा‍रतीय सैन्यात अतिविशिष्ठ सेवा पदक व परमविशिष्ठ सेवा पदक मिळाले होते.)
 
आपल्या ऑपरेशन ब्लू स्टार: अ ट्रु स्टोरी या पुस्तकात मेजर जनरल बरार म्हणतात. ३० मे रोजी मेरठ मधुन त्यांना तातडीने चंदिगढ येथे पोहचण्याचा संदेश मिळाला. तेथेच त्यांना संभाव्य कारवाईचे आदेश व नेतृत्व देण्यात आले. पुढे सांगण्यात आले, परिस्थिती फार बिघडली असुन येत्या २/४ दिवसात खलिस्तानची घोषणा होऊ शकते. यानंतर पंजाब पोलिस दल खलिस्तानच्या स्वाधीन होईल. यानंतर दिल्ली व हरियाणातील शीख पंजाब कडे कुच करुन, हिंदुं पंजाबातुन बाहेर येतील. १९४७ प्रमाणे दंगली उसळन्याची शक्यता आहे. याचवेळी पाकिस्तानही सीमा पार करुन समर्थन देऊ शकतो व बांगलादेश निर्मिती सारखा प्रकार भारतातही घडवला जाऊ शकेल.
ओळ २६:
३ जुन पासुनच भारतीय सेनेने सुवर्ण मंदिराच्या परिसरात मोर्चे बांधणी सुरु केली होती. आजुबाजुच्या काही इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशिनगन्स बसवल्या गेल्या. त्याचबरोबर ३ जुन पासुन सुवर्ण मंदिरा सभोवतालच्या परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली. ३ जुन पासुन ५ जुन पर्यंत अधुन मधुन काही फैरी दोन्ही बाजुंकडुन झाडण्यात आल्या. सुवर्ण मंदिरा जवळील इतर इमारतीतील दहशतवाद्यांनी फारसा प्रतिकार न करता समर्पण केले. मुख्य कारवाईस सुरवात सुवर्ण मंदिरात ५ जुनला रात्री १० वाजेच्या सुमारास झाली.
 
कारवाईची सुरवात रात्री ७ वाजेच्या सुमारास करण्याची योजना होती. त्यामुळे ५ वाजता भारतीय सेनेने लाउडस्पीकर वरुन सुचना देऊन ज्यांना बाहेर पडायचे असेल त्यांना बाहेर येण्यास सुचवले. पण कोणीही बाहेर आले नाही. पुन्हा रात्री ७ वाजता तशाच सुचना देण्यात आल्या पण प्रतिसाद मिळाला नाही अखेर रात्री ९ वाजता पुन्हा सुचना दिल्यानंतर ८ ते १० वृद्ध माणसे बाहेर आली. जनरल बरार यांच्या म्हणण्यानुसार या माण्सांनी सांगितले की आत मधुन इतर जणांनाही बाहेर यायचे आहे पण त्यांना येऊ दिले जात नाही. अखेर सैन्याने कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला.
 
सैन्याची सुरवातीची योजणा होती की दहशतवाद्यांचे बाहेरील कडे नष्ट झाल्यावर जर्नेल सिंह सकट इतर दहशतवाद्यांना समर्पण करायला लावायचे. पण प्रत्यक्ष सुवर्ण मंदिरात दडलेल्या दहशतवाद्यांच्या तयारीची व शस्त्र सामग्रीची सैन्याला कल्पना नव्हती. १० च्या सुमारास पॅराशुट रेजिमेंटच्या जवानांना मुख्य दरवाजातुन प्रवेश करुन मध्यभागी असणारया तळ्याच्या कडेने अकाल तख्त कडे पोहोचण्यास सांगितले. पण जवानांनी मुख्य दरवाजातुन आत प्रवेश करताच पायर्‍यांच्या दोन्ही बाजुंनी मशिन गन्स मधुन मारा करण्यात आला. यात बरेचसे जवान मारले गेले, काही जवान त्यावर मात करुन आत प्रवेश करण्यात यशस्वी झाले पण त्यांवर भागातुन मारा झाला अखेर त्यांनी बाहेर पडुन पहिला हल्ला नाकाम झाल्याचे जनरल बरार यांना कळवले. दहशतवाद्यांनी खिडक्यांवर वाळुने भरलेली पोती लावली होती. यामुळे त्यांच्या वर सरळ गोळीबार करता येत नव्हता त्यातच अश्रुधुराप्रमाणे काम करणारे सन ग्रेनेड भारतीय सैनिकांनी फेकल्यावर ते उलटुन परत येत होते.
==कारवाईचे परिणाम==
==संदर्भ आणि नोंदी==