"मराठी पुस्तके (संकेतस्थळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मराठी पुस्तके डॉट ऑर्ग हे मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोक...
(काही फरक नाही)

०५:५७, ७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

मराठी पुस्तके डॉट ऑर्ग हे मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता पुढाकार घेतलेले स्थळ आहे. येथे असलेली मराठी पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध असतात. निर्मितीत सहभाग करुन एखाद्या पुस्तकाची निर्मिती करणे हे या चळवळीतले मुख्य कार्य आहे. या स्थळावर पुस्तकांचा शोध घेता येतो.

योजना

मराठी पुस्तके डॉट ऑर्ग या स्थळाने अनेक योजना आखल्या आहेत. त्या अंतर्गत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, राजवाडे, ह. ना. आपटे अशा लेखकांचे साहित्य मराठीतून उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

तंत्रज्ञान

यासाठी प्रामुख्याने युनोकोड तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो. यातून ई-पुस्तकांची निर्मिती केली जाते ही पुस्तके वितरित करण्याचे प्रमुख साधन म्हणून हे संकेतस्थळ आहे.

प्रताधिकार

येथे असलेली पुस्तके प्रामुख्याने प्रताधिकारमुक्त किंवा विरहीत असतात. मराठीत अभिजात तरीही दुर्मिळ आणि प्रताधिकारमुक्त असे भरपूर साहित्य आहे. ते वाचकांना फारसे उपलब्ध नाही. काही नावाजलेली वाचनालये सोडल्यास, वाचण्यासाठी हे साहित्य जवळपास उपलब्ध नाही. या चळवळीच्या माध्यमातून या साहित्याची जागतिक उपलब्धता वाढेल.

निर्मिती सुरू असलेली पुस्तके

1. संगीत शारदा : लेखक - गोविंद् बल्लाळ देवल 2. मनाचे श्लोक : कवी - संत रामदास 3. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास - लेखक - वि.का.राजवाडे 4. गावगाडा : लेखक - त्रिंबक नारायण आत्रे. 5. स्त्री पुरुष तुलना : लेखिका : ताराबाई शिंदे 6. संगीत शाकुंतल : लेखक - अण्णासाहेब किर्लोस्कर 7. समग्र केशवसूत : कवी - केशवसूत. 8. महाराष्ट्रगीत - कवी - कोल्हटकर 9 यमुनापर्यटन : लेखक - बाबा पदमजी 10. समग्र बालकवी - कवी - बालकवी 11 फुले समग्र वाङ्मय - लेखक - महात्मा जोतिबा फुले.

तयार असलेली पुस्तके

संत साहित्य

  • मनाचे श्लोक
  • तुकाराम गाथा
  • दासबोध
  • ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका

ऐतिहासिक

  • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
  • स्त्री-पुरुष तुलना
  • सभासदांची बखर

कविता

  • महाराष्ट्रगीत
  • बालकवींच्या काही कविता
  • केशवसुतांच्या काही कविता
  • महात्मा फुलेंच्या काही कविता

नाटक

  • संगीत शारदा
  • संगीत शाकुंतल
  • राजसंन्यास

सामाजिक

  • म्हणी:विश्वकोष
  • ह्र्दय
  • गावगाडा

बाह्य दुवे