"सदस्य चर्चा:ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,५५१ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
==साइझ्=आकारमान==
मराठी‍त साइझकरिता आकारमान हा शब्द आहे, आकार नव्हे. आकार म्हणजे इंग्रजीत शेप. पक्ष्याचा आकार म्हटले की चौकोनी, गोल, वर्तुळाकार आदी शब्द डोळ्यासमोर उभे राहतात. पक्ष्याचे आकारमान म्हणणे कसेसेच वाटते, म्हणून मी लांबी असा बदल केला. हे वाचूनही आपल्याला आकार म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. मी परत लांबीचे आकार करीन.--J ०६:२०, २६ एप्रिल २०११ (UTC)
 
==पक्षी==
नमस्कार, तुमचे म्हणणे बरोबरच आहे. मी या विषयी आणखी काही ठिकाणी विचारणा केली. त्यावरून असे कळले की, पक्ष्यांचे आकार हे सामान्यपणे ज्ञात असलेल्या इतर पक्ष्यांशी तुलना करण्यासाठीच योग्य आहे. W.I.I. Dehradun येथील मित्र तसेच इतर मित्रांकडून असे कळले की, शास्त्रज्ञांनी लांबी मोजतांना पक्षी मृत होते. त्यांना आडवे ठेऊन (थोडे स्ट्रेच करून) त्यांची लांबी मोजण्यात आली, ती चोच ते पायाच्या बोटांपर्यंत धरण्यात येते. त्यामुळे लांबी हा शब्द प्रयोग बरोबर आहे. (पण पक्षी जिवंत असतांना जमिनीपासून डोक्यापर्यंत त्याची उंची मोजण्यात येते.) यात थोडा फरक पडतो. त्यामुळे आपण लेखात पक्ष्याची ज्ञात असलेल्या इतर सामान्य पक्ष्यांशी तुलना करावी (तेथे या पक्ष्याच्या आकार चिमणी / बुलबुल एवढा आहे) आणि कंसात त्याची लांबी लिहावी (लांबी की उंची असे न लिहिता). असे केल्याने सगळ्या लेखात सारखेपणा येईल आणि मोठ्या पक्ष्यांच्या बाबतीत (उदा. माळढोक, सारस वगैरे) त्यांची उंचीही लिहिता येईल. तुम्हाला काय वाटते? बाकी घाईने कोणतेच बदल न केल्याने बरे झाले. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) १४:०४, २६ एप्रिल २०११ (UTC)
१,८२०

संपादने