"सिद्धिविनायक (सिद्धटेक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''{{PAGENAME}}''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
[[चित्र:Siddhi Vinayak at Siddhatek.jpg|250px|right|thumb|सिद्धिविनायक (सिद्धटेक) मंदिर]]
श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.
== इतिहास ==
पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे.
== मंदिर ==
श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फुट रुंद आहे. मुर्ती उत्तराभिमुखी असून गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर [[चंद्र]], [[सूर्य]],[[गरुड]] यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे.
== भौगोलिक ==
श्री क्षेत्र सिद्धटेक [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यात]] [[कर्जत तालुका|कर्जत तालुक्यात]] [[भीमा नदी]]च्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
*सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे [[दौंड]]. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते.
*दौंड-काष्टी-[[बहादूरगड|पेडगाव]]मार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या [[शिवाजीनगर]] एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
*पुण्याहून [[हडपसर]]-लोणी-यवत-[[चौफुला]]-[[पाटस]]-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते.)
 
 
 
{{अष्टविनायक}}