"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ११:
ख्रिस्ताब्द १५० च्या दरम्यानच्या काळात [[क्लॉडियस टॉलेमियस]] (टॉलेमी) याने त्याच्या [[अल्मागेस्ट]] या पुस्तकाच्या सातव्या व आठव्या खंडात पाच तेजोमय दिसणार्‍या तार्‍यांची नोंद करून ठेवली आहे. त्याने [[सप्तर्षी]] व [[सिंह रास{{!}}सिंहराशी]] यांच्यादरम्यान एकही तारा नसलेल्या भागात असलेला तेजोमय प्रदेशही नोंदवला आहे. पहिल्या खर्‍या तेजोमेघाचा उल्लेख हा फारसी खगोलशास्त्रज्ञ [[अब्द अल्-रेहमान अल्-सुफी]] याच्या ''निश्चित तार्‍यांचे पुस्तक'' (९६४) या ग्रंथात सापडतो. [[अँड्रोमेडा दीर्घिका]] असलेल्या ठिकाणी त्याने "लहानसा ढग" असल्याचे नोंदवले आहे. त्याने [[ओम्रिकॉर्न व्हेलोरम]] हा तारकापुंज "तेजोमय तारका" म्हणून व ब्रॉकीच्या पुंजासारखे इतर तेजोमय खगोल सूचिबद्ध केले. ज्या [[अतिनवतारा{{!}}अतिनवतार्‍यामुळे]] [[क्रॅब तेजोमेघ{{!}}क्रॅब तेजोमेघाची]] निर्मिती झाली तो अतिनवतारा [[एसएन १०५४]]चे अरबी व चिनी खगोलशास्त्रज्ञांनी १०५४ मध्ये निरीक्षणे केली आहेत.
 
अज्ञात कारणांमुळे अल्-सुफी [[मृग तेजोमेघ{{!}}मृग तेजोमेघाची]] निरीक्षणे करण्यात अयशस्वी ठरला. नोव्हेंबर २६, १६१० रोजी निकोलास-क्लाऊडे फॅब्री द पेरिस्क याने दुर्बीण वापरून मृग तेजोमेघाचा शोध लावला. या तेजोमेघाचे निरीक्षण १६१८ मध्ये जोहान बाप्टिस्ट सायसॅट यानेदेखील केले होते. परंतु, या तेजोमेघावर सखोल संशोधन १६५९ मध्ये [[ख्रिस्तियान ह्युजेन्स]] याने करेपर्यंत झाले नाही, जो स्वतःस या तेजोमेघाचा शोधक माने.
 
१७१५ मध्ये [[एडमंड हॅले]] याने सहा तेजोमेघांची यादी प्रकाशित केली. या शतकामध्ये हा आकडा संथपणे वाढत राहिला व १७४६ साली जीन-फिलिप द चिसॉ याच्या यादी ही संख्या २० वर पोचली होती (८ नव्या तेजोमेघांसह). १७५१-५३ च्या काळात निकोलास लुई द लाकायल याने [[केप ऑफ् गुड होप]] येथून ४२ तेजोमेघ सूचिबद्ध केले.
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले