"ईमेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो [r2.5.1] सांगकाम्याने काढले: new:ई-पौ
छोNo edit summary
ओळ १:
ईमेल ('Electronic Mail' ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरुप) हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा [[इंटरनेट]]चा वापर करतात.इलेक्ट्रोनिक मेल, ज्याला आपण रोजचा वापरत ई-मेल ह्या नावानी ओळखतो, एका प्रकारची डिजीटल संदेशांची देवान घेवाण आहे जी एका लेखाकापासून सुरु होऊन अनेक वाचकांपर्यंत पोहोचते. आधुनिक ई-मेल संपूर्ण इंटरनेट वर आणि संगणकीय जाळ्यांवर पसरलेला आहे. थोड्या आधीच्या काळात संदेश पाठवणारा आणि वाचणारा एकाच वेळी ऑनलाईन येणे संदेश पोहोचण्यासाठी गरजेचे होते. ह्या प्रकाराला इंस्टन्ट असेही म्हणतात. आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोर (साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्वर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवून सुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाईन असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो.
ईमेल ('Electronic Mail' ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरुप) हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा [[इंटरनेट]]चा वापर करतात.
 
ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, त्याचा ई-मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचा पण ई-मेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश सविस्तरपणे लिहिलेला असतो.
 
प्राथमिक स्वरुपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टीमिडीया अ‍ॅटॅचमेंट्स म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टीमिडीया फाईली पाठवण्यासाठी सक्षम बनला. ह्या पद्धतीला मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स (MIME)असे म्हणतात.
 
आधुनिक आणि जगद्विख्यात ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "अर्पानेट” पर्यंत मागे घेऊन जातो. १९८० चा दशकात “अर्पानेट” चे इंटरनेट मध्ये झालेलेया रुपांतर मुले आजच्या ई-मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवल्या गेलेल्या ई-मेल आणि आजचा फक्त लिहिलेले संदर्भ असेल्या ई-मेल मध्ये कमालीचे साम्य आहे.
 
[[संगणकीय जाळ्यांचा]] मदतीने पाठवलेल्या ई-मेल प्रथामिक्त्या “अर्पानेट” वर फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP) चा प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून आत्तापर्यंत मात्र ई-मेल पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा वापर होतो.
 
 
व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टू ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/ईमेल" पासून हुडकले