"नारायणोपनिषद्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
, Replaced: ऱ्या → र्‍या (2)
छो moving from वर्ग:विकिसोर्स to वर्ग:विकिस्रोत using AWB
ओळ १२:
'''विश्वमेवेदं पुरुषस्तव्दिश्वमुपजीवति ॥२॥'''

सर्व जड वर्गांहून तो परमात्मा उत्कृष्ट-विनाशरहित असल्यामुळे नित्य, सर्वात्मक असल्यामुळे विश्व, जगत्कारणांत स्थित असल्यामुळे नारायण आणि पाप तसेच अज्ञान यांचे हरण करणारा असल्यामुळे हरि आहे; तसेच अज्ञदृष्ट्या दिसणारे हे सर्व तत्त्वदृष्ट्या परमात्माच आहे, असे ध्यान करावे. तो परमात्मा ह्या विश्वावर उपजीविका करतो(म्हणजे स्वतःच्या व्यवहाराचा निर्वाह व्हावा म्हणून त्याचा(विश्वाचा) आश्रय घेतो). ॥२॥

ओळ १९:
'''नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणम् ॥३॥'''

जगाचा पालक असल्यामुळे पति, आत्माचा(जीवाचा) नियामक असल्यामुळे ईश्वर, निरन्तर असल्यामुळे शाश्वत, परम मंगल असल्यामुळे शिव, चित्स्वभावापासून च्युत होत नसल्यामुळे अच्युत, नारायण, ज्ञेय तत्त्वांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे महाज्ञेय, जगाचे उपादानकारण आणि त्यामुळेच जगाहून अभिन्न असल्यामुळे विश्वात्मा आणि उत्कृष्ट असल्यामुळे परायण अशा ईश्वराचे ध्यान करावे. ॥३॥

ओळ ३४:
'''अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण: स्थित: ॥५॥'''

या वर्तमान जगांत जे काही नजिकचे जगत् दिसत आहे अथवा दूर असलेले जे जगत् ऎकू येत आहे त्या सर्वाला नारायण आतून आणि बाहेरून व्यापून राहिला आहे. (ज्याप्रमाणे मुकुट, कडे इ. आभूषणांचे उपादानकारण सुवर्ण त्यांना आतून आणि बाहेरून व्यापून राहते त्याप्रमाणे नारायण सर्वत्र व्यापून आहे.) ॥५॥

ओळ ४१:
'''पद्मकोशप्रतीकाश हदयंचाप्यधोमुखम् ॥६॥'''

नारायणाचे स्वरूप देशपरिच्छेदशून्य, विनाशरहित, चिद्रूप, सर्वज्ञ, समुद्राप्रमाणें अफ़ाट संसाराचे अवसानरूप आणि संसाराच्या उत्पत्तीचे कारण आहे. ज्याप्रमाणे अष्टदलकमळाचे मध्यछिद्र असते त्याप्रमाणें अधोमुख असे त्याचे ह्दय आहे. ॥६॥

ओळ ४८:
'''ज्वालमालाकुलंभाती विश्वस्याऽऽयतनंमहत् ॥७॥'''

ते गळ्याच्या खाली आणि नाभीच्या वर एक वीत अंतरावर असतें. त्यांत तें ब्रम्हांडाचे आधारभूत आणि प्रकाशाच्या परंपरेने युक्त असे परब्रम्ह भासतें. ॥७॥

ओळ ६३:
'''तिर्यगूर्ध्वमधःशायी रश्मयस्तस्यसंतता ॥९॥'''

त्या सुषुम्नानाळाच्या मध्यभागी अनेक ज्वालांनी युक्त आणि अनेक मुखांनी संपन्न असलेला महान अग्नि राहतो. आपल्या अग्रभागी आलेले अन्न खाणारा, अन्नाला जिरविणारा पण स्वतः जीर्ण न होणारा, कुशल असा तो वैश्वानर खालेल्या आहाराचा शरीरांतील सर्व अवयवांमध्ये विभाग करीत (अन्नरसाला शरीरभर वाटत) राहतों. त्या अग्नीचे खाली, वर आणि तिरकस पसरणारे किरण सर्वतः व्यापलेले असतात. ॥९॥

ओळ ७०:
'''तस्यमध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थितः ॥१०॥'''

पायांच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत सर्वत्र राहून तो आपल्या देहाला सर्वदा संतप्त करतो.(गरम ठेवतो. तो ऊबदारपणाच अग्नीच्या अस्तित्वाचे चिन्ह आहे.) आपल्या विशेष प्रकारच्या ज्वालांनी सकल देहाला व्यापणार्‍या त्या अग्नीच्या मध्यें एक अग्नीची ज्वाला आहे. ती अत्यंत सूक्ष्म असून सुषुम्ना नाडीच्या द्वारे वर ब्रम्हरंध्रापर्यंत पसरून राहिली आहे. ॥१०॥

ओळ ७७:
'''नीवारशूकवत्तन्वी पीता भास्वत्यणूपमा ॥११॥'''

जलामुळे नीलवर्ण दिसणार्‍या आकाशामध्ये, विद्युतलेखेप्रमाणें ती अग्निशिखा प्रभायुक्त, सांठ्याच्या कुसवासारखी सूक्ष्म(पातळ), बाहेरून पिवळी दिसणारी आणि दिप्तियुक्त असतें. तिला लौकिक अणूचीच उपमा देता येणे शक्य आहे. ॥११॥

ओळ ८६:
त्या अग्निशिखेच्या मध्ये जगत्कारणभूत परमात्मा विशेषरित्या अवस्थित आहे. तोच ब्रम्हदेव, तोच गौरिपति, तोच हरी, तोच इंद्र, तोच अक्षरसंज्ञक मायाविशिष्ट अन्तर्यामी, तोच परम म्हणजे मायारहित शुद्ध चिद्रूप आणि पारतंत्र्याच्या अभावी तो स्वराट् म्हणजे स्वयं राजा आहे.(सारांश, त्या सहस्त्रशीर्षादि पुरूषाचे वर सांगितल्याप्रमाणे ध्यान करावें.) ॥१२॥

[[वर्ग:उपनिषदे]]
[[वर्ग:विकिसोर्सविकिस्रोत]]