"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुद्धा → सुद्धा (2) using AWB
छो (सांगकाम्याने वाढविले: uk:Прашна-упанішада)
छो (शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुद्धा → सुद्धा (2) using AWB)

हे देवांनो, आम्ही [[यजन]] करताना, आराधना करताना आमच्या कानांनी मंगलकारक शब्द ऐकावेत, डोळ्यांनी शुभ पहावे. सुदृढ [[अवयव]] आणि आरोग्यसंपन्न शरीरे असणारे आम्ही परमात्म्याची स्तुती करत त्याच्या ऊपयोगास येईल असे आयुष्य भोगावे. ज्याची कीर्ती सर्वत्र श्रुत आहे असा [[इंद्र]] आमचे कल्याण करो; सर्व विश्वाचे ज्ञान असणारा पूषन्‌ ([[सूर्य]]) आमचे कल्याण करो; अरिष्टांचे निराकरण करणारा '''तार्क्ष्य''' ([[गरुड वैनतेय|गरुड]]) आमचे कल्याण करो आणि [[बृहस्पती]] आमचे कल्याण करो. हे परमात्मन्‌, आमच्याकरता [[भूलोक]], [[भुवर्लोक]] व [[स्वर्गलोक]] या तिन्ही लोकी शांती असो.

==प्रथम प्रश्न==
'''वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्नाः ॥१॥'''

[[भारद्वाज|भारद्वाजकुलोत्पन्न]] सुकेशा, [[शिबि]]चा पुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू [[गर्ग]] ऋषींच्या गोत्रात जन्मलेला सौर्यायणी, कोसलदेशनिवासी [[आश्वलायन]], '''विदर्भ'''देशनिवासी [[भार्गव]] आणि [[कात्यायन]] अर्थात कत्य ऋषींचा नातू कबन्धी, हे सर्व वेदपरायण आणि वेदनिष्ठ [[ब्राह्मण]] होते. स्वत: [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून घ्यावे अशी इच्छा धरून ते परब्रह्माचा शोध घेत फिरत होते. हातात [[समिधा]] घेतलेले हे सहाहीजण [[पिप्पलाद]] नावाच्या सुविख्यात ऋषींकडे आले. कारण [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून सांगण्यास [[पिप्पलाद]] ऋषी समर्थ आणि उत्सुक आहेत असे त्यांना समजले होते. ॥१॥

'''तान्ह स ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवत्स्यथ यथाकामं प्रश्नान्पृच्छत

'''यदि विज्ञास्यामः सर्वं ह वो वक्ष्याम इति ॥२॥'''

त्यांना ते [[पिप्पलाद ऋषी]] म्हणाले "तुम्ही [[ब्रह्मचर्य]] [[व्रत]] पाळून, [[तप]] करून एक वर्षभर येथे राहा. नंतर इच्छेप्रमाणे प्रश्न विचारा. जर आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे ज्ञात असतील तर आम्ही सर्व काही समजावून सांगू." ॥२॥

'''अथ कबन्धी कात्यायन उपेत्य प्रपच्छ।
भगवन्‌ कुतो ह वा इमाः प्रजाः प्रजायन्त इति ॥३॥'''

मग सर्वप्रथम कात्यायन कबन्धीने पिप्पलादांपाशी जाऊन प्रश्न विचारला "भगवन्‌, ही सर्व प्रजा - जीवजंतू, मनुष्यादि प्राणी - कोठून निर्माण झाली?" ॥३॥

'''तस्मै स होवाच प्रजाकामो वै प्रजापतिः स तपोऽतप्यत स तपस्तप्त्वा स मिथुनमुत्पादयते।

'''रयिं च प्राणं चेत्येतौ मे बहुधा प्रजाः करिष्यत इति ॥४॥'''

यावर पिप्पलाद उत्तरले "प्रजापती परमात्म्याला [[प्रजा]] उत्पन्न करण्याची इच्छा झाल्यावर त्याने तप करून प्रथम ''''रयि'''' आणि ''''प्राण'''' असे [[मिथुन]] ('''जोडपे''') निर्माण केले. रयि आणि प्राण यांनी मिळून सारी [[सृष्टी]] निर्माण करावी या हेतूने [[प्रजापती]] परमात्म्याने या दोघांची निर्मिती केली."
(जीवसृष्टीतील चैतन्य म्हणजे 'प्राण' (energy) आणि सर्व जड सृष्टी म्हणजे 'रयि' (matter) अशी संकल्पना आहे.)

'''आदित्यो ह वै प्राणो रयिरेव चन्द्रमा रयिर्वा एतत्‌ सर्वं यन्मूर्तं चामूर्तं च तस्मान्मूर्तिरेव रयिः ॥५॥'''

उदाहरणादाखल पिप्पलाद महर्षी सांगतात "[[सूर्य]] व [[चंद्र]] हे अनुक्रमे प्राण आणि रयि आहेत. सूर्यामुळेच सर्व जड तत्वांमध्ये [[ऊर्जा]], चैतन्य असते; तर चंद्रामध्ये सर्व जड तत्वांचे पोषण करण्याची शक्ती असते." ॥५॥

'''अथादित्य उदयन्यत्प्राचीं दिशं प्रविशति तेन प्राच्यान्‌ प्राणान्‌ रश्मिषु संनिधत्ते।

'''यद्दक्षिणां यत्प्रतीचीं यदुदीचीं यदधो यदूर्ध्वं यदन्तरा दिशो यत्सर्वं प्रकाशयति तेन सर्वान्‌ प्राणान्‌ रश्मिषु संनिधत्ते ॥६॥'''

जसा [[सूर्य]] रात्रीनंतर उगवून पूर्वेस प्रवेशतो, तसा तो पूर्वेकडिल प्राणांना आपल्या किरणांत धारण करतो. त्याप्रमाणे [[दक्षिण]] दिशेस, [[पश्चिम|पश्चिमेस]], [[उत्तर|उत्तरेस]], ऊर्ध्व दिशेस, अंतराळात तो जे जे प्रकाशित करतो ते ते तो आपल्या किरणांनी सचेतन करत असतो. म्हणजे '''सर्व दिशांना सर्वांना [[सूर्य]]च प्राणशक्ती देत असतो.''' ॥६॥

'''स एष वैश्वानरो विश्वरूपः प्राणोऽग्निरुदयते। तदेतदृचाभ्यामभ्युक्तम्‌ ॥७॥'''

तोच विश्वरूप सूर्य वैश्वानर नावाने सर्व प्राण्यांच्या शरीरात जठराग्नि होतो. हेच तथ्य ऋचांमध्ये स्पष्ट केले आहे. ॥७॥

'''विश्वरूपं हरिणं जातवेदसं। परायणं ज्योतिरेकं तपन्तम्‌।

'''सहस्ररश्मिः शतधा वर्तमानः। प्राणः प्रजानामुदयत्येष सूर्यः ॥८॥'''

विश्वरूप, हरि म्हणजे किरणांनी युक्त असणारा, जन्माला आलेल्या सर्वांबद्दल ज्ञान असलेला, सर्वांचा आधार, तेजरूप आणि अतिशय [[उष्ण]] असलेला, हजारो किरणांनी युक्त आणि शेकडो रुपांत वर्तमान राहणारा, उत्पन्न झालेल्या सर्व जीवांचा [[प्राण]] असणारा हा [[सूर्य]] उदय पावतो व सर्व कार्ये करतो. ॥८॥

'''संवत्सरो वै प्रजापतिस्तस्यायने दक्षिणं चोत्तरं च ।

'''एष ह वै रयिर्य: पितृयाण: ॥९॥'''

[[संवत्सर]] - [[वर्ष]] हा [[प्रजापती]] होय. या संवत्सराचे [[उत्तरायण]] आणि [[दक्षिणायन]] असे दोन भाग आहेत. अनित्य हेच नित्य आहे असे मानून जे उपासक त्याप्रमाणे आचार करतात, लोकोपयोगी कामे(सार्वजनिक सुखसोयी, यज्ञादी कर्मे) करतात, ते लोक चंद्रलोकापर्यंत जाऊन तेथे जय पावतात आणि तेच पुन्हा फिरून या जगात जन्माला येतात. [[मानव]] आणि इतर प्राणिवर्गादी प्रजांचे हित इच्छिणारे [[ऋषी]] म्हणून मान्यता पावलेले हे लोक [[स्वर्ग]] अस्तित्वात असून तो यज्ञयागाने, लोकोपयोगी कर्माने मिळतो अश्या श्रद्धेने कर्म करून [[दक्षिणायन|दक्षिणायनाचा]] आश्रय घेतात. गमनागमनाच्या या मार्गाला पितृयाण असे म्हणतात. जड सृष्टीच्या परिपोष करण्याचा हा मार्गच रयि होय. ॥९॥

'''अथोत्तरेण तपसा ब्रम्हचर्येण श्रद्धया विद्ययाऽऽत्मानमन्विष्यादित्यमभिजयन्ते ।

'''एतद्वै प्राणानामायतनमेतदमृतमभयमेतत्परायणमेतस्मान्न पुनरावर्तन्त इत्यैषः निरोध: तदेषः श्लोक: ॥१०॥'''

[[तप]], [[ब्रम्ह्चर्य]],श्रद्धा आणि विद्या यांच्या साहाय्याने आत्मरूपाची ओळख करून घेणारे आदित्य लोकाची प्राप्ती करून घेतात. ह्याला [[उत्तरायण]] असे म्हणतात. आदित्य हा प्राणिमात्रांचे वसतिस्थान आहे. हा आदित्य [[अमृत]] प्रदान करणारा आणि सर्वाना आश्रयभूत असणारा आहे. या [[आदित्य]] लोकाची प्राप्ती झाली असता पुन्हा [[जन्म]] येत नाही असा अबाधित नियम आहे. ॥१०॥

'''पञ्चपादं पितरं द्वादशाकृतिं दिव आहु: परे अर्थे पुरीषिणम् ।

'''अथेमे अन्य उ परे विचक्षणं सप्तचक्रे षडर आहुरर्पितमिति ॥११॥'''

अंतरिक्षाच्या पलीकडे [[संवत्सर]] आहे. तो उदकपूर्ण असून त्याला पाच [[पाय]] आणि बारा [[अवयव]] आहेत. तो जगाचा निर्माता आहे असे ज्ञानवान लोक म्हणतात. अन्य काही काळ्वेत्ते पंडित म्हणतात की [[संवत्सर]] काल हा सर्वज्ञ असून तो सात चक्रांच्या आणि सहा अरांच्या रथामध्ये बसलेला आहे. ॥११॥

'''मासो वै प्रजापतिस्तस्य कृष्णपक्ष एव रयि: शुक्ल: प्राणस्तस्मादेत ऋषय: शुक्ल इष्टं कुर्वन्तीतर इतरस्मिन्‌ ॥१२॥'''

[[मास]] (महिना) हा [[प्रजापती]] आहे. या मासाचा [[कृष्णपक्ष]] हा रयि आणि [[शुक्लपक्ष]] हा प्राण आहे. [[ऋषी]] शुक्लपक्षामध्ये आणि इतर लोक कृष्णपक्षामध्ये आपली इष्ट कर्तव्यें करतात. ॥१२॥

'''अहोरात्रौ वै प्रजापतिस्तस्याहरेव प्राणो रात्रिरेव रयि: प्राणं वा एते प्रस्कन्दन्ति

'''ये दिवा रत्या संयुज्यन्ते ब्रम्हचर्यमेव तद्यद्रात्रौ रत्या संयुज्यन्ते ॥१३॥'''

[[दिवस]] आणि [[रात्र]] मिळून होणारा दिवस हा प्रजापती आहे. त्यातील [[दिवस]] हा [[प्राण]] असून [[रात्र]] ही रयि किंवा [[अन्न]] आहे. म्हणून दिवसा जे लोक [[रतिसुख]] घेतात ते प्राणाला बाहेर टाकतात. परंतु जे कोणी [[रात्री]] उपभोग घेतात ते ब्रम्हचर्याचे पालन करतात. ॥१३॥

'''अन्नं वै प्रजापतिस्ततो ह वै तद्रेतस्तस्मादिमा: प्रजायन्त इति ॥१४॥'''

[[अन्न]] हाच [[प्रजापती]] आहे. अन्नापासून रेताची उत्पत्ती होते आणि या [[रेत|रेतापासून]] सर्व प्रकारची प्रजा निर्माण होते. ॥१४॥

'''तद्येह् वै तत्प्रजापतिव्रत् चरन्ति ते मिथुनमुत्पादयन्ते ।

'''तेषामवैष ब्रम्हलोको येषां तपो ब्रम्हचर्य येषु सत्यं प्रतिष्ठितम् ॥१५॥'''

प्रजापतिव्रताचे जे लोक आचरण करतात ते मिथुनाची उत्पत्ती करतात. जे लोक [[तप]] आणि [[ब्रम्हचर्य]] यांचे पालन करतात त्यांच्या ठिकाणी सत्यता आणि एकनिष्ठपणा या गुणांची प्रतिष्ठापना होते. असे लोक ब्रम्हलोकाची प्राप्ती करून घेतात. ॥१५॥

'''तेषामसौ विरजो ब्रम्हलोको न येषु जिह्ममनृंत माया चेति ॥१६॥'''

जे लोक वाकडया मार्गाने जात नाहीत, असत्यपणे वागत नाहीत आणि या मायेच्या मोहात सापडत नाहीत त्यांना ब्रम्हलोकाची प्राप्ती होते. ।।१६॥

इति प्रश्नोपनिषदि प्रथम प्रश्नः ॥

==द्वितीय प्रश्न==
'''भगवन्कत्येव् देवा: प्रजां विधारयन्ते कतर् एतत्प्रकाशायन्ते क: पुनरेषां वरिष्ठ् इति ॥१॥'''

नंतर भृगुकुलोत्पन्न वैदर्भीने पिप्पलाचार्यांना विचारले, 'आचार्य, कोणते [[देव]] प्रजेचे [[शरीर]] आहे. (प्रजा धारण करतात.) कोणते [[देव]] शरीरात्मक प्रजेला धारण करतात आणि या सर्व देवांमध्ये सर्व वरिष्ठ असा [[देव]] कोणता आहे?'

'''तस्मै स होवाच ।'''
'''ते प्रकाश्याभिवदन्ति वयमेतव्दाणमवष्टभ्य् विधारयाम्: ॥२॥'''

भार्गवाला [[पिप्पलाद]] म्हणाले, '[[आकाश]] हाच तो [[देव]] आहे. त्याचप्रमाणे [[वायू]], [[अग्नी]], [[आप]], [[पृथ्वी]], [[वाचा]], [[मन]], [[नेत्र]], [[कर्ण]] हे ही [[देव]] आहेत. ते या शरीराला प्रकाशित करतात (कार्यान्वित करतात) आणि अभिमानाने ते सर्व असे म्हणतात की या बाणाला (शरीराला) आम्हीच आश्रय देतो आणि धारण करतो. ॥२॥

'''तान्वरिष्ठ: प्राण उवाच ।'''
'''मा मोहमापद्यथाहमेवैतत्पञ्चधाSSत्मानं प्रविभज्यैतव्दाणमवष्टभ्य विधारयामीतिं तेSश्रद्धधाना बभूवु: ॥३।'''

त्यांना त्याच्यापेक्षा वरिष्ठ असा [[प्राण]] म्हणाला, 'असे मूढ होऊ नका. मीच स्वत:ला पाच प्रकारांनी विभक्त करून या शरीराला धारण करतो. पण त्याच्या या बोलण्यावर त्यांची श्रद्धा नव्हती. (ते त्यांना पटले नाही) ॥३॥

'''सोSभिमानादूर्ध्वमुत्क्रामत इव तस्मिन्नुत्क्रामत्यथेतरे सर्व एवोत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्व एव प्रातिष्ठन्ते ।'''
'''एवम् वाङ्मनश्चक्षु: श्रोत्रं च ते प्रीता: प्राणं स्तुन्वन्ति ॥४॥'''

तो [[प्राण]] अभिमानाने शरीरातून निघून वर निघाला तोच त्याच्याबरोबर इतर सर्व इंद्रियदेवता सुद्धाइंद्रियदेवतासुद्धा निघाल्या. तो (प्राण) पुन्हा शरीरात स्थिर झाला तेव्हा सर्व जागच्या जागी स्थिर झाले. जसे मधुकररूपी राजा (फुलावरून) उडाला की (मध)माशा पण लगेच उडतात आणि तो फुलावर येऊन बसला की त्याही बसतात तसेच [[वाचा]], [[मन]], [[नेत्र]], [[कर्ण]] यांचे [[देव]] उठले आणि पुन्हा बसले. तेव्हा प्राणाचे श्रेष्ठत्व लक्षात येऊन ते सर्व देव (इंद्रिये) प्राणाची स्तुती करू लागले. ॥४॥

'''एषोऽग्निस्तपत्येष सूर्य एष पर्जन्यो मघवानेष वायु:।'''
'''एष पृथिवी रयिर्देव: सदसच्चामृतं च यत् ॥५॥'''

देवांनी प्राणाची स्तुती कशी केली? ते म्हणाले, 'हा [[प्राण]]च [[अग्नि]]रूपाने [[उष्णता]] देतो. हाच [[पाऊस]] आणि पाऊसाचा [[देव]] [[इंद्र]] आहे. [[वायू]]ही हाच आहे. हाच [[पृथ्वी]] आहे. हाच रयि आहे. जे काही आहे आणि जे काही नाही आहे ते हाच आहे. [[अमृत]]ही हाच आहे. (अमृत याचा अर्थ [[परमात्मा]] असा येथे समजावा.) ॥५॥

'''अरा इव रथनाभौ प्राणे सर्व प्रतिष्ठितम् ।'''
'''ऋचो यजूँषि सामानि यज्ञ: क्षत्रं ब्रम्ह च ॥६॥'''

रथाच्या चाकाच्या आसामध्ये जसे [[आरे]] बसविलेले असतात, त्याप्रमाणे प्राणामध्येच सर्व स्थित असते. [[ऋग्वेद]], [[सामवेद]], [[यज्ञ]], [[क्षत्रिय]] आणि [[ब्राम्हण]] (जे [[यज्ञ]] करणारे आहेत ते) हे सर्व प्राणाच्या आधारेच स्थित आहेत. ॥६॥

'''प्रजापतिश्चरसि गर्भे त्वमेव प्रतिजायसे।'''
'''तुभ्यं [[प्राण]] प्रजास्त्विमा बलिं हरन्ति य: प्राणै: प्रतितिष्ठसि ॥७॥'''

हे प्राणा ! तूच [[प्रजापति]] आहेस. तूच गर्भात प्रवेश करून माता-पिता यांना अनुरूप असा [[जन्म]] घेतोस. तू जो अपानादि पाच प्राणरूपात प्रतिष्ठित आहेस, त्या तुलाच अन्नरूपाने बलि अर्पण करतात. ॥७॥

'''देवानामसि वहितम: पितृणां प्रथमा स्वधा । ऋषीणां चरितं सत्यमथर्वाङ् गिरसामसि ॥८॥'''

हे प्राणा, देवांचे मुख जो [[अग्नि]], त्या अग्नीचे सर्वोत्तम रूप तूच आहेस. अग्नीत आहुती दिल्या की त्या देवांना मिळतात हे खरे, पण प्राणांना जे बलि म्हणून अन्न-पाणी देहामध्ये अर्पण होते ते प्राणपोषण करणारे असते आणि [[प्राण]] हाच देवांचा आधार आहे म्हणून 'वन्हितम' अशी त्याची प्रशंसा केली आहे. तू [[पितर|पितरांना]] अर्पण केली जाणारी (स्वधा) प्रथम आहुती म्हणजेच श्रेष्ठ समर्पण आहेस. अर्थात [[पितर|पितरांनाही]] प्राणशक्तीनेच पोषण मिळते. [[अथर्व]] आणि [[अंगिरस]] यासारख्या क्रषींचे सत्य आचरण म्हणजेही तूच आहेस. ॥८॥

'''इन्द्रस्त्वं प्राण तेजसा रुद्रोऽसि परिरक्षिता । त्वमन्तरिक्षे चरसि सूर्यस्त्वं ज्योतिषां पति: ॥९॥'''

हे प्राणा ! तू तेजाने युक्त असा [[इंद्र]] आहेस, [[रूद्र]] आहेस आणि संपूर्ण रक्षण करणारा आहेस. अंतरिक्षात वाहणारा [[वायू]] तूच आहेस आणि सर्व आकाशस्थ तेजस्वी [[ग्रह|ग्रहांचा]] मुख्य असा [[सूर्य]]ही तूच आहेस. ॥९॥

'''यदा त्वमभिवर्षस्यथेमा: प्राणते प्रजा: । आनन्दरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यतीति ॥१०॥'''

हे प्राणा, तू जेव्हा चांगला [[पाऊस]] पाडतोस तेव्हा, आता उत्तम असे अन्नधान्य मिळेल या विचाराने सर्व प्रजा (प्राणिमात्र) आनंदित होतात. (अर्थात अग्नीरूप [[प्राण]], [[इंद्र]], [[रुद्र]], [[सूर्य]] रूप प्राण, हाच [[मेघ]]रूपही आहे.) ॥१०॥

'''व्रात्यस्त्वं प्राणैकर्षिरत्ता विश्व्स्य सत्पति: । वयमाद्यस्य दातार: पिता त्वं मातरिश्व न: ॥११॥'''

हे प्राणा, तू असा एकमेव क्रषी आहेस की जो (व्रात्य) संस्कारांनी शुद्ध होण्याची आवश्यकताच नाही. तू स्वाभाविकच शुद्ध आहेस. तू विश्वाचा सत्यार्थाने पालनकर्ता (पति) आहेस. तुझे अदन (आद्य) म्हणजे हविष्यान्न आम्ही तुला अर्पण करतो. (आम्ही जे अन्न भक्षण करतो ते हे प्राणा, तुलाच समर्पण होते.) सर्वत्र संचार करणारा (मातरिश्वा) असा तूच वायुरूपाने आमचा पिता आहेस, कारण आम्ही तुझ्यामुळेच उत्पन्न झालो आहोत. ॥११॥

'''या ते तनूर्वाचि प्रतिष्ठिता या श्रोत्रे या च चक्षुषि ।'''
'''या च मनसि सन्तता शिवां तां कुरू मोत्क्रमी: ॥१२॥'''

हे प्राणा, जे तुझे स्वरूप वाणीमध्ये आहे, जे कर्णामध्ये आहे, जे नेत्रांत आहे, जे मनामध्ये सम्यक रीतीने भरून आहे ते रूप कल्याणप्रद असेच कर; आम्हाला ते आधारभूत आणि पोषकच राहो. तू निघून जाऊ नकोस. ॥१२॥

'''प्राणस्येदं वशे सर्व त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् ।'''
'''मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञां च् विधेहि न इति ॥१३॥'''

या जगातील सर्व काही प्राणाच्या अधीन आहे आणि स्वर्गातील जे जे काही आहे ते ही प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, माता जसे पुत्रांचे रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर आणि राजांचे वैभव आणि ब्राम्हणांची [[प्रज्ञा]] आम्हाला दे. (ही स्तुती शरीरातील सर्व इंद्रियदेवता करीत आहेत.) ॥१३॥

इति प्रश्नोपनिषदि व्दितीय: प्रश्न: ॥

==तृतीय प्रश्न==
'''कथं प्रतिष्ठते केनोत्क्रमते कथं बाह्यमभिधत्ते कथमध्यात्ममिति ॥१॥'''

नंतर [[पिप्पलाद]] मुनींना [[कोसल]] देशातील [[आश्वलायन]] याने विचारले - 'भगवन, हा [[प्राण]] कुठून उत्पन्न होतो? या शरीरात तो कसा येतो? स्वःताचे विभाग करून कसा राहतो? कशा प्रकारे तो निघून जातो? बाह्य जगाला कसे धारण करतो (व्यवस्थित ठेवतो)? आणि शरीरांतर्गत व्यवस्था कशा प्रकारे नीट ठेवतो? ॥१॥

'''तस्मै स होवाचातिप्रश्चान् पॄच्छसि ब्रम्हिष्ठोऽसीति तस्मात्तेऽहं ब्रवीमि ॥२'''
'''आत्मन एष प्राणो जायते । यथैषा पुरूषे छायैतस्मिन्नेतदातं मनोकृतेनायात्यस्मिञ्शरीरे ॥३॥'''

त्याला [[पिप्पलाद]] म्हणाले, ' तू फारच खोल प्रश्न विचारतो आहेस. पण तू ब्रह्मनिष्ठ आहेस म्हणून मी तुला सांगतो. हा [[प्राण]] [[आत्मा|आत्म्यापासून]] उत्पन्न होतो. पुरूषाची सावली जशी त्याच्यातच असते त्याचप्रमाणे हा प्राण आत्म्याच्या ठिकाणी आश्रित असतो आणि या शरीरात तो मनाने केलेल्या इच्छेने, संकल्पाने प्रवेश करतो. (अर्थात मनुष्याच्या संकल्पानुसार त्याला शरीर प्राप्त होते.) ॥२,३॥

'''यथा सम्रादेवाधिकृतान् विनियुङ्त्क्ते ।'''
'''एतन् ग्रामानोतान् ग्रामानधितिष्टस्वेत्येवमेवैष प्राण इतरान् प्राणान् पृथक पृथगेव सन्निधत्ते ॥४॥'''

एखादा [[सम्राट]] ज्याप्रमाने ' अमुक इतक्या गावांचा तू [[अधिकारी]], अमुक दुसर्‍या काही गावांचा हा दुसरा माणूस [[अधिकारी]] होईल' या प्रमाणे विविध अधिकार्‍यांची नियुक्ती करतो त्याप्रमाणे हा [[प्राण]], [[अपान]] आदि इतर प्राणांना वेगवेगळे काम आणि स्थान नेमून देतो. ॥४॥

'''पायूपस्थेऽपानं चक्षुःश्रोत्रे मुखनासिकाभ्यां प्राणः स्वयं प्रातिष्टते मध्ये तु समानः ।'''
'''एष ह्येतद्धुतमन्नं समं नयति तस्मादेताः सप्तार्चिषो भवन्ति ॥ ५ ॥'''

[[गुदद्वार]] आणि त्याजवळचे [[लिंग]] याठिकाणी तो अपानाला प्रस्थापित करतो. [[नेत्र]], [[कान]], [[मुख]] आणि [[नाक]] याठिकाणी तो प्राण स्वतः स्थित असतो आणि शरीराच्या मध्यवर्ती स्थानात तो 'समान' वायूला स्थापतो. तो समान वायूच खाल्लेले [[अन्न]] सर्वत्र समत्वाने पोहोचवतो. या प्राणामुळेच सात प्रकाशमय ज्योती उत्पन्न होतात. (२ डोळे + २ कान + २ नाकपुड्या + १ मुख) ॥५॥

'''हृदि ह्येष आत्मा ।'''

हा प्रसिद्ध [[आत्मा]] हदयस्थानी राहतो. तेथे एक शत [[नाडी|नाड्या]] आहेत. त्या एकेका [[नाडी]]ला आणखी प्रत्येकी शंभर नाड्या निघतात आणि त्यांनाही प्रत्येकी ७२ सहस्र उपनाड्या फुटतात. या सर्व नाड्यात व्यान वायूचा संचार असतो. ॥६॥
(व्यान वायू ज्या नाड्यात संचारतो त्या [[मज्जासंस्था|मज्जासंस्थेचा]] [[ज्ञानतंतू]] आणि क्रियासंदेशवाहक तंतू (सेन्सरी नर्व्हस आणि मोटर नर्व्हस) समजाव्या तसेच सूक्ष्म शुद्ध आणि अशुद्ध [[रक्तवाहीनी|रक्तवाहीन्या]] (कँपिलरीज) त्यात येतात. इथे शत आणि सहस्र या संख्या नेमकी गणना करून नव्हे तर प्रचंड मोठी संख्या आहे असे सांगण्यासाठी योजिल्या आहेत.)

'''अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम् ॥ ७ ॥'''

आणि एका नाडीने उदान वायू शरीरातील वरच्या भागात संचरतो. पुण्यकारक कर्मे करणार्‍या जीवात्म्याला तोच पुण्यमय उच्च लोकात (स्वर्ग) नेतो आणि पापमय कर्मे जास्त करणार्‍या जीवात्म्याला मनुष्यामध्ये हीन अशा योनीत नेतो. पुण्य आणि पाप समान असतील त्यांना हा वायु पुन्हा मनुष्यलोकातच जन्म प्राप्त करून देतो. ॥७॥

'''आदित्यो ह वै बाह्यः प्राण उदयत्येष ह्येनं चाक्षुषं प्राणमनुगृह्णानः ।'''
'''पृथिव्यां या देवता सैषा पुरुषस्यापानमवष्टभ्यान्तरा यदाकाशः स समानो वायुर्व्यानः ॥ ८ ॥'''

खरोखर सूर्य हाच बाह्य जगातील प्राण आहे. तो नेत्रातील प्राण शक्तीवर (अनुग्रह करणारा असा) उदय पावतो. त्यामुळे नेत्रांना पाहण्याची शक्ती येते. पृथ्वीमध्ये जी देवता आहे ती मनुष्याच्या अपान वायूला त्याच्या जागी स्थिर करते. आकाश या महाभूताच्या ठिकाणी 'समान' वायू असतो आणि व्यान वायू हाच बाह्य जगातील 'व्यान' होय. सूर्य नेत्रांच्या ठिकाणी, पृथ्वी गुदद्वार आणि लिंग, नाभीच्या खालचा बस्तीभाग याठिकाणी, आकाश सर्व जठर, आंत्र आदि 'धड' यासर्व सर्व बाह्य अवयवांच्या ठिकाणी, वायू हा सर्व शरीरभर, अंतर्भागात आधारभूत होतात. ॥८॥

'''तेजो ह वा उदानस्तस्मादुपशान्ततेजाः । पुनर्भवमिन्द्रियैर्मनसि सम्पध्यमानैः ॥ ९ ॥'''

सूर्य आणि अग्नी यांचे जे तेजोमय बाह्य शरीर आहे, तोच बाह्य जगतातील उदान वायू आहे. तो शरीराच्या बाह्यांगाला उष्ण ठॆवतो आणि अंतरंगातही उष्णता कायम राखतो. जेव्हा उदान वायू शरीरातून निघून जातो तेव्हा मनासहित इंद्रियेही शरीरात उष्णता न राहिल्यामुळे उदानाबरोबर शरीर सोडून जातात आणि दुसर्‍या शरीराचा आश्रय घेतात. हाच पुनर्जन्म होय. ॥९॥

'''यच्चित्तस्तेनैष प्राणमायाति । प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना तथासङ्कल्पितं लोकं नयति ॥ १० ॥'''

जीवात्मा ज्या प्रकारचा संकल्प चित्तात वागवीत असतो त्या संकल्पाला, उदान वायू बरोबर प्राणात स्थिर राहून आपल्या बरोबर मन आणि इंद्रिये घेऊन गमन करतो. अर्थात उदान आणि प्राण यांसह जीवात्मा वासनेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे भिन्न-भिन्न लोकी जातो. ॥१०॥

'''य एवं विद्वान् प्राणं वेद न हास्य प्रजा हीयतेऽमृतो भवति तदेषः श्लोकः ॥ ११ ॥'''

जो कोणी ज्ञानी प्राणाचे असे स्वरूप आणि गुणधर्म जाणतो (सदाचार आणि सद्वासना यांचा अवलंब करतो) त्याची संतती नष्ट होत नाही, त्यांच्या संततीची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही. हे स्पष्ट करणारा श्लोक पुढीलप्रमाणे आहे. ॥११॥

'''उत्पत्तिमायतिं स्थानं विभुत्वं चैव पञ्चधा ।'''
'''अध्यात्मं चैव प्राणस्य विज्ञायामृतमश्नुते विज्ञायामृतमश्नुत इति ॥ १२ ॥'''

जो प्राणाची उत्पत्ती, त्याचा शरीरातील प्रवेश, त्याचे बाह्य जगतातील पाच प्रकारचे अस्तित्व आणि शरीरातील (त्याचे) पाच प्रकारचे कार्य आणि व्यापकता जाणतो तो त्या ज्ञानाने अमृतच सेवन करतो, परमानन्दमय अविनाशी परब्रम्ह परमेश्वराशी तद्रूप होऊन मुक्तीतच निरन्तर अमरत्वाने राहतो. तो अमृत सेवन करतो. (हे निश्चित म्हणून दोनदा सांगितले आहे.) ॥१२॥

इति प्रश्नोपनिषदि तृतीयः प्रश्नः ॥

==चतुर्थ प्रश्न==

'''अथ हैनं सौर्यायणि गार्ग्यः पप्रच्छ ।'''
'''कस्यैतत् सुखं भवति कस्मिन्नु सर्वे सम्प्रतिष्टिता भवन्तीति ॥ १ ॥'''

त्यानंतर त्या पिप्पलाद मुनींना गर्ग गोत्रातील सौर्यायणीने प्रश्न विचारले - 'भगवन, या मनुष्यशरीरात कोण कोण झोपतात? त्यात कोण कोण जागृत असतात? कोणता देव स्वप्ने पाहणारा असतो? येथे सुख कोणाला होते? हे सगळे कशामध्ये स्थित आहेत?' ॥१॥

'''तस्मै स होवच ।'''
'''नादत्ते नानन्दयते न विसृजते नेयायते स्वपितीत्याचक्षते ॥ २ ॥'''

त्याला पिप्पलाद म्हणाले, ' हे गार्ग्य. सूर्य अस्ताला गेला की त्याचे किरण त्याच्या तेजोमंडलात जसे एकत्र होतात आणि वारंवार सूर्य उगवला की ते (रोज) जसे पसरतात त्याप्रमाणेच निद्रेच्या वेळी सर्व इंद्रिये त्या परम देवाच्या (आत्म्याच्या) मनात एकत्र होतात; त्यामुळे तो मनुष्य ऎकत नाही, पाहत नाही, वास घेत नाही, रस चाखत नाही, स्पर्श करत नाही, बोलत नाही, आनंद पावत नाही, काही सोडून देत नाही आणि चालतही नाही. या स्थितीत, 'तो निजला आहे असे' म्हटले जाते.' ॥२॥

'''प्राणाग्रय एवैतस्मिन् पुरे जाग्रति ।'''
'''गार्हपत्यो ह वा एषोऽपानो व्यानोऽन्वाहार्यपचनो यद्गार्हपत्यात् प्रणीयते प्रणयनादाहवनीयः प्राणः ॥ ३ ॥'''

त्यावेळी मनुष्य शरीरात पाच प्राणरूप अग्नी जागृत असतात. (आपण झोपतो तेव्हा श्वास, उच्छवास, अन्नपचन, मलमूत्रनिर्मिती, रुधीरप्रवाह आदि शारीरिक कार्ये चालूच असतात.) प्राण हेच अग्नीरूप असतात. अपान वायू हा गार्हपत्य अग्नी होय. व्यान हा आहार पचविणारा (दक्षिणाग्नि) अन्वाहार्यपचन नावाचा अग्नी असून गार्हपत्य अग्नीतून घेऊन जो अग्नी यज्ञकुंडापर्यत (प्रणीतापात्राने) नेला जातो तो प्राणवायू आहवनीय अग्नी समजावा. प्र+नयन = नेणे. म्हणून प्राण असे नाव झाले. अन्नरूप आहुती ज्यात दिली जाते तो 'आहवनीय' अग्नी म्हणजेच प्राण समजला जातो. ॥३॥

'''यदुच्छ्वासनिःश्वासावेतावाहुती समं नयतीति स समानः ।'''
'''मनो ह वाव यजमानः । इष्टफलमेवोदानः । स एनं यजमानमहरहर्ब्रह्म गमयति ॥ ४ ॥'''

वर नेला जाणारा श्वास आणि खाली सोडला जाणारा श्वास ह्या आहुती. सर्वत्र समान प्रमाणात नेतो तो समान वायू हाच आहुती घालणारा (होता) असून मन हाच यज्ञकर्ता आहे. या शरीरात निद्रा समयी जो असा यज्ञ चालतो त्याचे फल म्हणजेच उदान वायू होय. तोच मनाला प्रतिदिनी निद्रासमयी ब्रम्हलोकात घेऊन जातो. (इथे ब्रम्हलोक याचा अर्थ ह्दयस्थान असा घ्यावा. ब्रम्हलोकात सृष्टीचा 'संकल्प' उठतो. म्हणून शरीरात ह्दय हा ब्रम्हलोक होय. निद्राकाळी मन कोठे लीन होऊन राहते याचा विचार येथे केला आहे आणि ते कार्य उदानवायू करतो असे म्हटले आहे. एकंदरीत झोपेच्या वेळी सुद्धावेळीसुद्धा पंचप्राणाचे कार्य चालते, शरीरात उष्णता कायम राहते, झीज आणि पोषण होतच असते याचे हे वर्णन आहे.) ॥४॥

'''अत्रैष देवः स्वप्ने महिमानमनुभवति । '''
'''यद्दृष्टं दृष्टमनुपश्यति श्रुतं श्रुतमेवार्थमनुशृणोति देशदिगन्तरैश्च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति दृष्टं चादृष्टं च श्रुतं चाश्रुतं चानुभूतं चाननुभूतं च स्च्चासच्च सर्वं पश्यति सर्वः पस्यति ॥ ५ ॥'''

स्वप्नामध्ये हा जीवात्मारूपी देव स्वतःच्याच रूपाचा अनुभव घेतो. जे वारंवार जागृत अवस्थेमध्ये त्याने पाहिलेले असते तेच दृश्य तो अंतरात पाहतो. जे वारंवार ऎकलेले असेल तेच तो वारंवार ऎकतो. ज्या विषयांचा पुन्हा पुन्हा अनुभव घेतलेला असेल त्यांचाच अनुभव वारंवार घेतो. तसेच त्याने पाहिलेली आणि न पाहिलेली दृश्ये तो पाहतो, पूर्वी ऎकलेले आणि न ऎकलेलेही तो ऎकतो. ज्यांचा त्याला अनुभव आलेला असतो ते आणि अनुभव नसतो तेही तो अनुभवतो; तसेच त्याला सत्य गोष्टी दिसतात आणि ज्यांना वास्तविक अस्तित्व नाही त्याही तो पाहतो. तो स्वतःच सर्व वस्तू होतो आणि स्वतःच त्या पाहतोही. ॥५॥

'''स यदा तेजसाऽभिभूतो भवति ।'''
'''अत्रैष देवः स्वप्नान्न पश्यत्यथ यदैतस्मिञ्शरीर एतत्सुखं भवति ॥ ६ ॥'''

जेव्हा त्याच्यावर उदान वायूरूप तेजाचा प्रभाव असतो तेव्हा हा आत्मरूपी देव स्वप्ने पाहत नाही. तेव्हा या शरीरात तो आत्मा सुषुप्तीचे सुख अनुभवतो. (कारण मन उदानवायूने ह्दय स्थानी म्हणजेच ब्रम्हलोकात नेले जाते तेथे ते शान्त असते.) ॥६॥

'''स यथा सोभ्य वयांसि वसोवृक्षं संप्रतिष्ठन्ते ।'''
''' एवं ह वै तत् सर्वं पर आत्मनि संप्रतिष्ठते ॥ ७ ॥'''

हे प्रिय शिष्या, ज्याप्रमाणे पक्षी आपल्या निवासरूप वृक्षावर सायंकाळी येऊन आरामात राहातात, त्याप्रमाणेच पुढे वर्णन केलेली सर्व (पृथ्वीपासून प्राणांपर्यत) तत्त्वे परमात्म्याच्या ठायी आश्रय घेतात. ॥७॥

'''पृथिवी च पृथिवीमात्रा चापश्चापोमात्रा च तेजश्च तेजोमात्रा च वायुश्च वायुमात्रा चाकाशश्चाकाशमात्रा
१}वाणी आणि तिने बोलण्याचा विषय २}हात आणि त्यांनी घ्यावयाची वस्तू ३}लिंग आणि त्यांने घ्यावयाचा आनंद ४}गुद आणि त्याने करण्याचे उत्सर्जन कार्य ५}पाय आणि त्यांचे चालणे.
(ड) नंतर अंतःकरणाचे भाग सांगतात :-
१}मन आणि मनाचे मंतव्य २}बुद्धी आणि बुद्धीने जाणावयाचा विषय ३}अहंकार आणि अहंकाराचा विषय ४}चित्त आणि त्याची चेतना ५}तेज आणि त्याने प्रकाशित करावयाचा पदार्थ ६}प्राण आणि त्याची धारण करण्याची वस्तू. या सर्व गोष्टी परमात्म्यात आश्रय घेतात. ॥८॥

'''एष हि द्रष्ट स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मन्ता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः ।'''
'''स परेऽक्षर आत्मनि संप्रतिष्ठते ॥ ९ ॥'''

हा जो पाहणारा, स्पर्श करणारा, ऎकणारा, वास घेणारा, रस चाखणारा, मनन करणारा, समजून घेणारा, कर्म करणारा, विज्ञानस्वरूप जीवात्मा आहे तो अविनाशी परमात्म्या मध्ये प्रतिष्ठित होऊन राहतो. ॥९॥

'''परमेवाक्षरं प्रतिपद्यते स यो ह वै तदच्छायमशरीरम्लोहितं शुभ्रमक्षरं वेदयते यस्तु सोम्य ।'''
'''स सर्वज्ञः सर्वो भवति । तदेष श्लोकः ॥ १० ॥'''

हे प्रिय शिष्या, जो त्या अविनाशी अशा परमात्म्याचे अनुसंधान राखतो आणि छायारहित, शरीररहित, रंगरहित, विशुद्ध अशा क्षर (र्‍हास) नसलेल्या परमात्म्याला जाणतो तो सर्वज्ञ होय आणि तोच सर्व विश्वरूप जाणिवेछा त्यासंबंधीचा एक श्लोक पुढीलप्रमाणे आहे. ॥१०॥

'''विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वैः प्राणा भुतानि संप्रतिष्ठन्ति यत्र तदक्षरं वेदयते यस्तु सोम्य स सर्वज्ञः सर्वमेवाविवेशेति ॥ ११ ॥'''

ज्या परमात्म्यात प्राण, पंचमहाभूते, सर्व इंद्रिये आणि अंतकरणसहित विज्ञानस्वरूप जीवात्मा ही सर्व तत्त्वे आश्रय घेतात त्या अक्षर अविनाशी परमात्म्याला जो कोणी जाणतो तो सर्व काही जाणणारा होतो आणि सर्वत्र एकाच वेळी (ईश्वराप्रमाणे) प्रवेश करतो. विश्वव्यापी जाणिवेचा होतो. ॥११॥

इति प्रश्नोपनिषदि चतुर्थः प्रश्नः ॥

==पंचम प्रश्न==
'''कतमं वाव स तेन लोकं जयतीति । तस्मै स होवाच ॥ १ ॥'''

त्यानंतर पिप्पलाद मुनींना शिबि पुत्र सत्यकामाने प्रश्न विचारला, "हे भगबन, मनुष्यामध्ये जो कोणी मृत्युपर्यंत ओंकाराचे उत्तम प्रकारे ध्यान करतो तो त्या उपासनेच्या बलाने कोणत्या लोकावर विजय मिळवतो? निःसंशय जय मिळवतो?" (अर्थात आमरण प्रणवोपासना केल्यास काय फल मिळते?) ॥१॥

'''एतद्वै सत्यकाम परं चापरं च ब्रह्म यदोङ्कारः । तस्माद्विद्वानेतेनैवायतनेनैकतरमन्वेति ॥ २ ॥'''

पिप्पलाद त्याला म्हणाले, 'हे सत्यकामा जे पर आणि अपर असे ब्रम्ह आहे तेच हा ॐ कार आहे. त्यामुळे याचे ज्ञान असणारा मनुष्य याच्याच एका आयतनाने (जप, स्मरण आणि चिंतनाने) त्या दोन ब्रम्हातील एका ब्रम्हाचे अनुसरण करतो. ॥२॥

'''स यध्येकमात्रमभिध्यायीत स तेनैव संवेदितस्तूर्णमेव जगत्याभिसंपध्यते ।

'''तमृचो मनुष्यलोकमुपनयन्ते स तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नो महिमानमनुभवति ॥ ३ ॥'''

जर त्याने ॐ कारच्या एकाच भागाचे (अ या मात्रेचे) ध्यान केले अर्थात एक मात्रेचे त्याचे स्पंदन उत्पन्न होईल असा उच्चार आणि अशी धारणा केली तर त्याने तो मृत्युनंतर अशा सुखाला आणि ऎश्वर्याला पात्र होईल की त्यासाठी तो मानवयोनीतच पुन्हा जन्म घेईल. तेथे क्रग्वेदाची व्याप्ती आहे. त्यामुळे त्याची क्रग्वेदाकडे प्रवृत्ती होईल. तेथे तपश्चर्या, ब्रम्हचर्य आणि श्रद्धा यांनी युक्त असा तो ऎश्वर्ययुक्त होऊन राहील. पुढे त्याच्या तपाने तो अधिकाधिक श्रेष्ठ सुख प्राप्त करील. ॥३॥

'''अथ यदि द्विमात्रेण मनसि संपध्यते सोऽन्तरिक्षं यजुर्भिरुन्नीयते सोमलोकम् ।

आणि जर दोन मात्रांच्या ॐकाराचा उच्चार (अ+उ) तो मनाची एकाग्रता ठेवून करील तर यजुर्वेदातील क्रचांची प्रेरणा मिळून तो सोम (चंद्र) लोकापर्यंत जाईल. सोमलोकात सुख भोगून तो पुन्हा दृश्य जगतात जन्माला येईल. ॥४॥

(एक मात्रेचा ॐकार म्हणजे ओऽम्. दोन मात्रांचा ॐकार म्हणजे ओऽऽम्. तीन मात्रांचा ॐकार म्हणजे ऒऽऽऽम्. हे म्हणण्याचा, षड्जापासून निषादापर्यंत कोणता स्वर आपण म्हणावा ही गोष्ट गुरूगम्य आहे.)

'''यः पुनरेतं त्रिमात्रेणोमित्येतेनैवाक्षरेण परं पुरुषमभि-ध्यायीत स तेजसि सूर्ये संपन्नः ।

'''ब्रह्मलोकं स एतस्माज्जीवघनात् परात्परं पुरुशयं पुरुषमीक्षते । तदेतौ श्लोकौ भवतः ॥ ५ ॥'''

पण जो तीन मात्रांच्या (अ उ म )ॐकाराच्या या अक्षरानेच या परम पुरूषाचे अंतरंगात ध्यान करील तो तेजोमय सूर्यलोकी जातो. ज्याप्रमाणे साप कात टाकून मोकळा होतो त्याचप्रमाणे तोही पापांपासून सर्वथा मुक्त होतो. तो 'साम' वेदातील क्रचांनी ब्रम्हलोकात नेला जातो. तो या जीव समुदायापेक्षा खूप उच्च अशा देहरूपी पुरीत राहणार्‍या परम पुरूषाला अर्थात पुरुषोत्तमाला पाहू शकतो. त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो. हे स्पष्ट करणारे दोन श्लोक पुढीलप्रमाणे आहेत. ॥५॥

'''तिस्रो मात्रा मृअत्युमत्यः प्रयुक्ता अन्योन्यसक्ताः अनविप्रयुक्ताः ।

'''क्रियासु बाह्याभ्यन्तरमध्यमासु सम्यक् प्रयुक्तासु न कम्पते ज्ञः ॥ ६ ॥'''

ॐ च्या अ, उ आणि म या तीन मात्रा; एक दुसरीशी जोडलेली अशा किंवा वेगवेगळ्या म्हटल्या तरीही त्रिलोकापर्यंतच त्यांची गती असल्यामुळे त्यांचा प्रयोग करणारा कितीही उच्च अवस्थेपर्यंत गेला तरी त्याची मृत्युपासून, मृत्युच्या या त्रैलोक्यमय क्षेत्रापासून मुक्ती होत नाही. पण त्यांचा अ=बाह्य, उ=अंतरातील आणि म=त्यांच्या मधील क्रियांमध्ये सम्यक; योग्य प्रकारे उपयोग केला तर ज्ञानी म्हणजे परमेश्वराचे ज्ञान झालेला मनुष्य विचलित होत नाही. अविनाशी ब्रम्हाशीच एक्याने राहतो. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि भावनामय सर्व क्रियांत प्रणवाचे ध्यान आणि प्रणववाच्या परब्रम्हाचे ध्यान अखंड ठेवावे म्हणजे आत्मस्वरूपापासून तो साधक च्युत होत नाही, जन्ममरणाच्या फेर्‍यात पडत नाही. ॥६॥

'''ऋग्भिरेतं यजुर्भिरन्तरिक्षं सामभिर्यत् तत् कवयो वेदयन्ते ।

'''तमोङ्कारेणैवायतनेनान्वेति विद्वान् यत्तच्छान्तमजरममृतमभयं परं चेति ॥ ७ ॥'''

ऋग्वेदाने एकमात्रा ॐ चा अभ्यास करणारा साधक मनुष्यलोकात नेला जातो, दोन मात्रांच्या ॐ चा अभ्यास करणारा साधक यजुर्वेदाने अंतरिक्षात नेला जातो. पूर्णरूपाने ॐ चा अभ्यास करणारा साधक सामवेदाने ब्रम्हलोकी नेला जातो; त्या ब्रम्हलोकाचे ज्ञान ज्ञानीजनांना असते. विद्वान साधक केवळ ॐ च्या अवलंबनानेच त्या परम पुरुषोत्तमाला प्राप्त होतो - जो शांत, जरारहित, अमर आणि भयरहित असून सर्वश्रेष्ठ आहे. ॥७॥

इति प्रश्नोपनिषदि पञ्चमः प्रश्नः ॥

==षष्ठम प्रश्न==
'''स तूष्णीं रथमारुह्य प्रवव्राज । तं त्वा पृच्छामि क्वासौ पुरुष इति ॥ १ ॥'''

नंतर त्यांना भरव्दाजपुत्र सुकेशा याने विचारले,"भगवन्, कोसल देशाचा राजपुत्र हिरण्यनाभ ह्याने माझ्याकडे येऊन प्रश्न विचारला की सोळा कला असलेला पुरुष तुला माहित आहे का? त्या कुमाराला मी म्हटले की तो कोण ते मला माहीत नाही. मला माहीत असते तर मी नक्की सांगितले असते. जो खोटे बोलतो त्याचा समूळ नाश होतो. म्हणून मी खोटे बोलणे योग्य नाही. (माझे बोलणे ऎकल्यावर) तो काही न बोलता रथावर बसून निघून गेला. त्याचा तोच प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की, तो (सोळा कलांचा) पुरुष कोठे असतो?" ॥१॥

'''तस्मै स होवाच । इहैइवान्तःशरीरे सोभ्य स पुरुषो यस्मिन्नताः षोडशकलाः प्रभवन्तीति ॥ २ ॥'''

त्याला पिप्पलाद म्हणाले, "हे प्रिय शिष्या, तो सोळा कला असलेला पुरुष इथेच शरीराच्या अंतर्यामी असतो." ॥२॥

'''स ईक्षाचक्रे । कस्मिन्नहमुत्क्रान्त उत्क्रान्तो भविष्यामि कस्मिन्वा प्रतिष्टिते प्रतिष्टस्यामीति ॥ ३ ॥'''
'''एवमेवास्य परिद्रष्टुरिमाः षोडशकलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्यास्तं गच्छन्ति भिध्येते चासां नामरुपे पुरुष इत्येवं प्रोच्यते स एषोऽकलोऽमृतो भवति तदेष श्लोकः ॥ ५ ॥'''

नद्या वाहत वाहत समुद्राकडे जातात आणि समुद्रात त्या अस्त पावतात. मग त्यांची वेगवेगळी नावे आणि रूपे जातात आणि त्यांना समुद्रच म्ह्टले जाते. तसेच या सर्वसाक्षी परमात्म्याकडे या सोळा कला जातात आणि विलय पावतात. त्यांची वेगवेगळी नामरूपे नष्ट होतात आणि त्या सर्वांना पुरुष असे म्हटले जाते. तोच कलारहित आणि अमर, अविनाशी परमात्मा होय. त्या परमात्म्याविषयी श्लोक पुढील प्रमाणे आहे. ॥५॥

'''अरा इव रथनाभौ कला यस्मिन्प्रतिष्टिताः । तं वेध्यं पुरुषं वेद यथ मा वो मृत्युः परिव्यथा इति ॥ ६ ॥'''

रथचक्राच्या मध्याशी ज्याप्रकारे आरे जोडलेले असतात त्याप्रमाणे (ह्या १६) कला ज्याच्यात अंतर्भूत आणि प्रतिष्ठित आहेत त्या जाणण्यायोग्य पुरुषाला जाणावे म्हणजे तुम्हाला मृत्यु दुःख देऊ शकणार नाही. (हे ज्ञान ज्याला होते तो ही असाच कलांनी विरहित केवल अमर असे ब्रम्हच होतो. मृत्यु हा शरीराचा आणि बाह्य 'कलां' चा होतो, आत्म्याचा नाही हे समजले तर देहान्ताचे दुःख वाटत नाही.) ॥६॥

'''तान् होवाचैतावदेवाहमेतत् परं ब्रह्म वेद । नातः परमस्तीति ॥ ७ ॥'''

त्यानंतर पिप्पलाद मुनी त्या सर्वांना म्हणाले, परब्रम्हाचे एवढेच ज्ञान मला आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ (आणखी काही) नाही. ॥७॥

'''ते तमर्चयन्तस्त्वं हि नः पिता योऽस्माकमविध्यायाः परं परं तारयसीति ।'''

'''नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः ॥ ८ ॥'''

पिप्पलाद मुनींनी एवढे सांगितल्यावर सहाही शिष्यांनी त्यांची पूजा केली आणि आदरपूर्वक म्हटले - आपणच आमचे पिता आहात, कारण आपण आम्हाला अविद्यतून पार करून आमचा उद्धार करीत आहात. ( नंतर त्या सहाही शिष्यांनी त्यांना वंदन केले आणि म्हटले) परमश्रेष्ठ अशा क्रषींना वंदन असो. परमश्रेष्ठ अशा क्रषींना वंदन असो. ॥८॥

इति प्रश्नोपनिषदि षष्ठः प्रश्नः ॥

'''ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पष्येमाक्षभिर्यजत्राः ।'''

'''स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।'''

'''स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥'''

'''ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥'''

[[वर्ग:उपनिषदे]]
[[वर्ग:विकिसोर्स]]